
बीजेपीनं निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून एक राजकीय डावपेच टाकल्याची चर्चा रंगली आहे.
निवडणूक पथ्यावर; बंगाल,तामिळनाडू,आसाम,मजा आहे तुमची! 2.27 लाख कोटींची खैरात
मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या बजेटवरुन संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. शेतक-यांपासून सर्वसामान्य लोकांपर्यत सर्वांनाच बजेटमध्ये काय असणार, काय स्वस्त होणार, काय महागणार याची चर्चा होती. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा बजेट सादर करण्यात आले तेव्हा अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेषत; बंगाल, तामिळनाडू आणि आसाम राज्यांतील विधानसभेची मुदत संपणार असल्याने त्या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी त्यांच्यावर घोषणांची खैरात केल्याची चर्चा आहे.
बीजेपीनं निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून एक राजकीय डावपेच टाकल्याची चर्चा रंगली आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिणी राज्यांत तब्बल 3500 किलोमीटर्स लांबीचा हायवे तयार केला जाणार आहे. त्यासाठी जी तरतूद करण्यात आली आहे ती 1.03 लाख कोटी रुपयांची आहे. त्यातून हा भव्य स्वरुपाचा हाय वे तयार करण्यात येणार आहे. तसेच सीतारमण यांनी यावेळी मुंबई-कन्याकुमारी या इकोनॉमिक कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
पश्चिम बंगालसाठी 95 हजार कोटी रुपयांची तरतूद करुन 675 किलोमीटर लांबीचा हायवे तयार करण्यात येणार आहे. जो कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणार आहे. सीतारामन यांनी आपल्या बजेटमध्ये परिवहन राजमार्ग यासाठी 1.18 लाख कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यातून 65 हजार कोटी रुपयांमधून 1100 किलोमीटर लांबीचा राजमार्ग तयार केला जाणार आहे. आसाममध्येही 19 हजार कोटी रुपये हे केवळ रस्ता बांधणीसाठी वापरले जाणार आहेत. पुढील तीन वर्षात तब्बल 1300 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. त्याला हायवे आणि इकोनॉमिक कॉरिडॉर असे म्हटले गेले आहे.
तामिळनाडूमध्ये 3500 किलोमीटर लांबीचा हायवे तयार केला जाणार आहे. सीतारमण म्हणाल्या की. तामिळनाडूतील नॅशनल हायवेसाठी प्रोजेक्ट तयार केला गेला आहे. की जो मुंबई आणि कन्याकुमारी यांना जोडणारा असेल. तामिळनाडू, केरळ, आणि बंगाल या राज्यांना 2.27 लाख कोटी रुपये या बजेटच्या माध्यमातून मिळाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून 2.27 लाख रुपये या राज्यांसाठी खास राखून ठेवले आहेत. विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यात भाजपने ममता बॅनर्जींच्या सरकारला आव्हान दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या.
BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार
एप्रिल 2021 मध्ये आसामच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने आसाममध्ये 60 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. तर पिछेहाट झालेल्या काँग्रेसला फक्त 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत आहे. केरळ राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप राज्यात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. गेल्या कित्येक वर्षांपासून भाजप केरळमध्ये धडपडत आहेत. 2016 च्या निवडणुकीत एलडीएफला 91 जागा मिळाल्या होत्या. तर 47 जागा युडीएफने जिंकल्या होत्या.
Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर
तामिळनाडूमध्ये सध्या एआयडीएमकेची सत्ता असलेल्या तामिळनाडुमध्ये 234 जागांसाठी मे 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. तामिळनाडुत प्रमुख लढत अण्णाद्रमुक आणि डीएमके यांच्यात आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला 136 तर डीएमकेला 89 जागा मिळाल्या होत्या.