वटवृक्षाची आरोग्यछाया ! article writes banyan tree health indian culture ayurveda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

वटवृक्षाची आरोग्यछाया !

भारतीय संस्कृतीत सर्व निसर्गतत्त्वांना देवता समजून त्यांची पूजा-अर्चा करण्याचा प्रघात आहे. यामुळे पूजनीय गोष्टींचे जतन-वर्धन आपोआप होत असते हे कोणीही मान्य करेल. हजारो एकरांवरील वने नष्ट झाली तरी ‘देवराई’ आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत हे याचेच द्योतक होय. वसुबारसेला गाईची पूजा, नागपंचमीला नागाची पूजा, नारळीपौर्णिमेला जलाची पूजा अशा प्रकारे सर्व निसर्गतत्त्वांची पूजा आपल्याकडे केली जाते.

त्यात वृक्षवल्लींचे महत्त्व जनमानसात रुजवण्याच्या दृष्टीने ज्या दिवसाची योजना केली तो आहे उद्याचा वटपौर्णिमेचा दिवस!वटवृक्षाला भारताच्या राष्ट्रीय वृक्षाचा बहुमान मिळालेला आहे. वडाच्या झाडाच्या आश्रयाने असंख्य प्राणी, पक्षी, मुंग्या, कीटक आपले जीवन जगत असतात. आपला भारत देशही वटवृक्षाप्रमाणे विविध धर्माच्या, पंथाच्या, संस्कृतीच्या लोकांना आश्रय देण्यास समर्थ असतो हे यातून अधोरेखित होत असावे.

वटवृक्ष स्थिरता, शक्ती व दीर्घायुष्याचा प्रतिकरूप असतो. याचे बीज अगदी लहान म्हणजे फार फार तर सव्वा ते दीड मिलीमीटर इतके लहान असते, पण त्यात महाकाय वृक्ष तयार करण्याची क्षमता असते. वडाचे झाड पसरत जाणारे असते, मुख्य खोडाला फुटणाऱ्या फांद्यांपासून ज्या पारंब्या निघतात त्या जमिनीपर्यंत पोचल्या की त्यातून उपवृक्ष तयार होत असतात. भारतातील सर्वांत मोठे वडाचे झाड कलकत्त्याजवळील आचार्य जगदीशचंद्र बोस या बोटॅनिकल गार्डनमध्ये असून ते साडेतीन एकर परिसराला व्यापून राहिलेले आहे.

वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो.

नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच. गावात वडाचे झाड नाही असे कधीच होत नाही. गावाबाहेर देवळापाशी वा टेकडीवरच्या महादेवाच्या मंदिरापाशी असलेले वडाचे झाड हा एक कुतूहलाचा विषय असतो व त्याच्या आख्यायिकाही अनेक असतात.

शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात.

लावलेल्या वाळक्या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात. ज्या मोजक्या झाडातून अधिक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित होत असतो त्यापैकी एक म्हणजे वड, हे आज आधुनिक शास्त्रानेही सिद्ध केलेले असल्याने वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास-दोन तास वडाच्या सान्निध्यात राहणे,

आज्ञाचक्रातल्या ग्रंथीला उत्तेजना देण्यासाठी झाडाला सूत गुंडाळण्याच्या निमित्ताने झाडाला प्रदक्षिणा घालणे अशा गोष्टींमुळे शरीरातील अग्नीचे म्हणजे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन व्हायला पण खूप मदत होते.

हे सर्व देवासाठी व धर्मासाठी केलेले कर्मकांड आहे असे समजल्यामुळे वडाचे झाड नसले तर भिंतीवर त्याचे चित्र काढून पूजा करणे किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून पूजा करणे याचा उपयोग कसा होणार? फार तर फार यामुळे आपल्याला वटवृक्षाचे महत्त्व लक्षात आले आहे.

किंवा वृक्षपूजा करणे हे आपले कर्तव्य आहे हे दाखवता येईल किंवा मनाची समजूत घालता येईल, पण यापलीकडे आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्याला वृक्षवल्लीकडून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या दृष्टीने याचा उपयोग होणार नाही.

वडाच्या झाडाचे काही महत्त्वाचे औषधी उपयोग याप्रमाणे सांगता येतात,

लघवीला व्यवस्थित होत नसली, लघवी होताना जळजळ होत असली, लघवी पूर्ण झाली आहे असे वाटत नसले तर वडाच्या पिकलेल्या पानांचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो. वडाची ४-५ पिकलेली पाने एक लिटर पाण्यात घालून एक अष्टमांश काढा करता येतो.

ताप आला असता घाम आणण्यासाठी वडाची पाने उपयोगी असतात. साळीच्या लाह्यांचे पीठ पाण्यात मिसळावे, त्यातच स्वच्छ धुतलेली वडाची २-३ पाने टाकावीत व एक अष्टमांश काढा करावा. हा काढा घेण्याने घाम येतो व ताप कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेला ताप या उपायाने चांगल्या प्रकारे कमी होतो.

वडाला पालवी फुटते त्यावेळी फांदीच्या टोकाला कळीप्रमाणे दिसणारे अंकुर येतात. हे वटांकुर अतिशय पित्तशामक असतात, पित्तामुळे नागीण उठल्यास खूप दाह होतो, त्यावर वटांकुर बारीक वाटून लेप करण्याचा उपयोग होतो.

वडाचे अंकुर शुक्रवर्धक असतात तसेच गर्भाशयाची ताकदही वाढवितात म्हणूनच वटांकुर गर्भधारणेस मदत करतात. ताजे वटांकुर वाटून त्याच्या बोराएवढ्या आकाराच्या तीन गोळ्या रोज तूप-साखरेसह घेण्याने व वरून दूध पिण्याने गर्भधारणा होण्यास मदत मिळते.

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळ दीर्घायुषी व्हावे यासाठी पहिल्या महिन्यात वटांकुर आठपट दुधात वाटून सेवन करण्यास सांगितले आहे.

वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात किंवा पाळीव्यतिरिक्त अति रक्तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो.

गोवर-कांजिण्या आल्यावर दाह होत असल्यास थंड पाण्यात वडाची साल वाटून लेप करण्याने बरे वाटते.जखम भरत नसल्यास त्यावर वडाची साल ठेचून बांधण्याचा आणि बरोबरीने वडाच्या सालीचा काढा घेण्याचा उपयोग होतो.

तोंड येते त्यावरही वड-उंबराच्या सालीच्या व काढ्याच्या गुळण्या करण्याने किंवा ७-८ मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याने बरे वाटते.

तापात अंगाची आग होत असताना वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो.प्रमेहावर वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो.वडाच्या पारंब्यांसह इतर केश्‍य द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल केसांसाठी चांगले असते. यामुळे केस लांब, दाट व गडद रंगाचे होण्यास मदत मिळते.

जुलाब होत असल्यास वडाच्या पारंब्या तांदळाच्या धुवणासह वाटून ताकासह देण्याचा उपयोग होतो.पित्तामुळे उलट्या होत असताना वडाच्या पारंब्या भिजत घातलेले पाणी पिण्याचा उपयोग होतो. या पाण्यामुळे तहानही शमते, पित्तामुळे येणारी चक्कर कमी होते.

ताकद वाढविण्यासाठी, धातुवृद्धिसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असते. चमचाभर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण आठ दिवस घेण्याने गुण येतो.

जळवातामुळे हाता-पायाला भेगा पडतात त्यावर वडाचा चीक लावण्याचा फायदा होतो. यामुळे वेदना पटकन कमी होतात.विंचू चावल्यास वरून वडाचा चीक लावण्याची पद्धत आहे.

भारतीय संस्कृतीत सर्व निसर्गतत्त्वांना देवता समजून त्यांची पूजा-अर्चा करण्याचा प्रघात आहे. यामुळे पूजनीय गोष्टींचे जतन-वर्धन आपोआप होत असते हे कोणीही मान्य करेल. हजारो एकरांवरील वने नष्ट झाली तरी ‘देवराई’ आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत हे याचेच द्योतक होय.

वसुबारसेला गाईची पूजा, नागपंचमीला नागाची पूजा, नारळीपौर्णिमेला जलाची पूजा अशा प्रकारे सर्व निसर्गतत्त्वांची पूजा आपल्याकडे केली जाते. त्यात वृक्षवल्लींचे महत्त्व जनमानसात रुजवण्याच्या दृष्टीने ज्या दिवसाची योजना केली तो आहे उद्याचा वटपौर्णिमेचा दिवस!

वटवृक्षाला भारताच्या राष्ट्रीय वृक्षाचा बहुमान मिळालेला आहे. वडाच्या झाडाच्या आश्रयाने असंख्य प्राणी, पक्षी, मुंग्या, कीटक आपले जीवन जगत असतात. आपला भारत देशही वटवृक्षाप्रमाणे विविध धर्माच्या, पंथाच्या, संस्कृतीच्या लोकांना आश्रय देण्यास समर्थ असतो हे यातून अधोरेखित होत असावे. वटवृक्ष स्थिरता, शक्ती व दीर्घायुष्याचा प्रतिकरूप असतो.

याचे बीज अगदी लहान म्हणजे फार फार तर सव्वा ते दीड मिलीमीटर इतके लहान असते, पण त्यात महाकाय वृक्ष तयार करण्याची क्षमता असते. वडाचे झाड पसरत जाणारे असते, मुख्य खोडाला फुटणाऱ्या फांद्यांपासून ज्या पारंब्या निघतात त्या जमिनीपर्यंत पोचल्या की त्यातून उपवृक्ष तयार होत असतात.

भारतातील सर्वांत मोठे वडाचे झाड कलकत्त्याजवळील आचार्य जगदीशचंद्र बोस या बोटॅनिकल गार्डनमध्ये असून ते साडेतीन एकर परिसराला व्यापून राहिलेले आहे. वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो.

नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच. गावात वडाचे झाड नाही असे कधीच होत नाही. गावाबाहेर देवळापाशी वा टेकडीवरच्या महादेवाच्या मंदिरापाशी असलेले वडाचे झाड हा एक कुतूहलाचा विषय असतो व त्याच्या आख्यायिकाही अनेक असतात.

शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात.

लावलेल्या वाळक्या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात. ज्या मोजक्या झाडातून अधिक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित होत असतो त्यापैकी एक म्हणजे वड, हे आज आधुनिक शास्त्रानेही सिद्ध केलेले असल्याने वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास-दोन तास वडाच्या सान्निध्यात राहणे,

आज्ञाचक्रातल्या ग्रंथीला उत्तेजना देण्यासाठी झाडाला सूत गुंडाळण्याच्या निमित्ताने झाडाला प्रदक्षिणा घालणे अशा गोष्टींमुळे शरीरातील अग्नीचे म्हणजे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन व्हायला पण खूप मदत होते. हे सर्व देवासाठी व धर्मासाठी केलेले कर्मकांड आहे असे समजल्यामुळे वडाचे झाड नसले तर भिंतीवर त्याचे चित्र काढून पूजा करणे किंवा एखादी छोटी फांदी तोडून आणून पूजा करणे याचा उपयोग कसा होणार?

फार तर फार यामुळे आपल्याला वटवृक्षाचे महत्त्व लक्षात आले आहे किंवा वृक्षपूजा करणे हे आपले कर्तव्य आहे हे दाखवता येईल किंवा मनाची समजूत घालता येईल, पण यापलीकडे आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्याला वृक्षवल्लीकडून मिळणाऱ्या आशीर्वादाच्या दृष्टीने याचा उपयोग होणार नाही.

वडाच्या झाडाचे काही महत्त्वाचे औषधी उपयोग याप्रमाणे सांगता येतात,लघवीला व्यवस्थित होत नसली, लघवी होताना जळजळ होत असली, लघवी पूर्ण झाली आहे असे वाटत नसले तर वडाच्या पिकलेल्या पानांचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो. वडाची ४-५ पिकलेली पाने एक लिटर पाण्यात घालून एक अष्टमांश काढा करता येतो.

ताप आला असता घाम आणण्यासाठी वडाची पाने उपयोगी असतात. साळीच्या लाह्यांचे पीठ पाण्यात मिसळावे, त्यातच स्वच्छ धुतलेली वडाची २-३ पाने टाकावीत व एक अष्टमांश काढा करावा. हा काढा घेण्याने घाम येतो व ताप कमी होतो. विशेषतः पित्तामुळे आलेला ताप या उपायाने चांगल्या प्रकारे कमी होतो.

वडाला पालवी फुटते त्यावेळी फांदीच्या टोकाला कळीप्रमाणे दिसणारे अंकुर येतात. हे वटांकुर अतिशय पित्तशामक असतात, पित्तामुळे नागीण उठल्यास खूप दाह होतो, त्यावर वटांकुर बारीक वाटून लेप करण्याचा उपयोग होतो.

वडाचे अंकुर शुक्रवर्धक असतात तसेच गर्भाशयाची ताकदही वाढवितात म्हणूनच वटांकुर गर्भधारणेस मदत करतात. ताजे वटांकुर वाटून त्याच्या बोराएवढ्या आकाराच्या तीन गोळ्या रोज तूप-साखरेसह घेण्याने व वरून दूध पिण्याने गर्भधारणा होण्यास मदत मिळते.

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळ दीर्घायुषी व्हावे यासाठी पहिल्या महिन्यात वटांकुर आठपट दुधात वाटून सेवन करण्यास सांगितले आहे.वडाच्या सालीचा काढा घेण्याने स्त्रियांच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्राव जात असल्यास कमी होतो. पाळीच्या दिवसात किंवा पाळीव्यतिरिक्त अति रक्तस्राव होत असल्यास तो कमी करण्याचा उपयोग होतो.

गोवर-कांजिण्या आल्यावर दाह होत असल्यास थंड पाण्यात वडाची साल वाटून लेप करण्याने बरे वाटते.जखम भरत नसल्यास त्यावर वडाची साल ठेचून बांधण्याचा आणि बरोबरीने वडाच्या सालीचा काढा घेण्याचा उपयोग होतो.

तोंड येते त्यावरही वड-उंबराच्या सालीच्या व काढ्याच्या गुळण्या करण्याने किंवा ७-८ मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याने बरे वाटते.तापात अंगाची आग होत असताना वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो.

प्रमेहावर वडाच्या पारंब्यांचा काढा घेण्याचा उपयोग होतो.वडाच्या पारंब्यांसह इतर केश्‍य द्रव्यांनी संस्कारित केलेले तेल केसांसाठी चांगले असते. यामुळे केस लांब, दाट व गडद रंगाचे होण्यास मदत मिळते.जुलाब होत असल्यास वडाच्या पारंब्या तांदळाच्या धुवणासह वाटून ताकासह देण्याचा उपयोग होतो.

पित्तामुळे उलट्या होत असताना वडाच्या पारंब्या भिजत घातलेले पाणी पिण्याचा उपयोग होतो. या पाण्यामुळे तहानही शमते, पित्तामुळे येणारी चक्कर कमी होते.ताकद वाढविण्यासाठी, धातुवृद्धिसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असते. चमचाभर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण आठ दिवस घेण्याने गुण येतो.

जळवातामुळे हाता-पायाला भेगा पडतात त्यावर वडाचा चीक लावण्याचा फायदा होतो. यामुळे वेदना पटकन कमी होतात.विंचू चावल्यास वरून वडाचा चीक लावण्याची पद्धत आहे.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

टॅग्स :doctorayurvedahealth