अभ्यंगाकरता टिप्स

आयुर्वेदामध्ये वातदोष हे प्रत्येक रोगाचे मूळ कारण असते असे सांगितलेले आहे. त्यामुळे कुठल्याही रोगावर उपचार करताना वातदोषाचे संतुलन प्रामुख्याने करावे.
Abhyang
Abhyangsakal
Summary

आयुर्वेदामध्ये वातदोष हे प्रत्येक रोगाचे मूळ कारण असते असे सांगितलेले आहे. त्यामुळे कुठल्याही रोगावर उपचार करताना वातदोषाचे संतुलन प्रामुख्याने करावे.

- डॉ. मालविका तांबे

आयुर्वेदामध्ये वातदोष हे प्रत्येक रोगाचे मूळ कारण असते असे सांगितलेले आहे. त्यामुळे कुठल्याही रोगावर उपचार करताना वातदोषाचे संतुलन प्रामुख्याने करावे. यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे त्या जागी तेल लावणे, ज्याला आपण अभ्यंग असे म्हणतो. अभ्यंग करत असताना काही चुका झाल्या तर मात्र गोष्ट सुधारण्याच्या जाही बिघडते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊ या की तेल लावताना काय काय काळजी घेता येऊ शकते, जेणेकरून अभ्यंगाचा संपूर्ण फायदा आपल्याला मिळू शकेल.

1) अभ्यंगासाठी वापरण्यात येणार तेल हे शक्यतो आयुर्वेदिक रित्या सिद्ध केलेले असावे. डोके, सांधे, त्वचा वगैरे ठिकाणी कुठलेही तेल लावले तर त्याचे आत शोषले जाणे अत्यंत अवघड असते. तसेच त्यात वनस्पती टाकल्या असल्या तर त्यांचेही शोषण होऊन व्यवस्थित कार्य करणे अपेक्षित असते. तेल तयार करत असताना व्यवस्थित प्रक्रिया केलेली नसली तर तेल वरच्या वर राहते व अंघोळ करताना धुतले जाते.

2) आयुर्वेदात सर्व तेलांमध्ये उच्च स्थान तिळाच्या तेलाला दिलेले आहे. त्यामुळे शक्य असल्यास तिळाचे तेल वापरणे जास्त उत्तम असते. त्वचा संवेदनशील असल्यास खोबरेल तेल वापरल्यास चालू शकते. सध्याऑलिव्ह तेलाने मसाज करण्याची पद्धत रूढ होत चाललेली आहे. ऑलिव्ह तेल लावत असताना हाताला हलके वाटले तरी ते त्वचेत व्यवस्थितपणे शोषले जात नाही तसेच ऑलिव्ह तेल आयुर्वेदिक रित्या सिद्ध करायचे म्हटले तर ते सिद्ध करणे अत्यंत अवघड असते, कारण ते पटकन जळून जाण्याची शक्यता असते.

3) शक्यतो अभ्यंग करण्याआधी तेल कोमट केलेले असावे. ४० डिग्री तापमानाचे तेल अभ्यंगाकरता उत्तम समजले जाते. तेल गॅसवर गरम करण्यापेक्षा कोमट पाण्यात ठेवलेले जास्त उत्तम. यासाठी आम्ही घरात बेबी बॉटल वॉर्मर वापरण्याचा सल्ला देत असतो.

4) सहसा एकाच प्रकारचे तेल सगळीकडे वापरले जात नाही. कुठल्या त्रासासाठी तेल लावायचे आहे हे पाहून कुठले तेल वापरायचे आहे हे ठरवावे. त्वचा, सांधे, स्नायू वगैरे कुठला वातदोष कमी करायचा आहे, लिगामेंटला दुखापत झालेली आहे का, सांधे वा हाडे भरून काढायची आहेत का, सांधेदुखीचा त्रास होतो आहे का, तेल दुखण्यासाठी लावायचे आहे की स्नायू शिथिल करण्यासाठी लावायचे आहे अशा अनेकांगांनी विचार करून कुठले तेल वापरावे याची योजना करावी.

5) तेलाच्या मात्रेचा विचार करत असताना वातप्रकृतीच्या व्यक्तीच्या त्वचेत रुक्षपणा अधिक असल्यामुळे तेल अधिक प्रमाणात लागते. तसेच कफप्रकृतीच्या व्यक्तीच्या सांध्यांमध्ये, त्वचेमध्ये तेलकटपणा जास्त असल्यामुळे तेल कमी प्रमाणात लागते. वयाचा विचार केला तर जास्त वयात शरीरात वात वाढल्यामुळे कोरडेपणा जास्त असल्यामुळे तेलाची मात्रा जास्त लागू शकते, तसेच कमी वयात तेलाची मात्रा कमी लागते.

6) शरीराच्या कुठल्या भागावर तेल लावायचे आहे त्यानुसार ते कसे लावावे (स्ट्रोक्स) हे ठरवावे. शरीराला, पाठीला खालून वर, डोक्यावर गोलाकार दिशेत, सांध्यावर लावताना त्या त्या सांध्याचा आकार लक्षात घेऊन (उदा. गुडघ्याच्या पुढच्या भागाला गोलाकार व मागच्या बाजूला खालून वर) करावा.

7) तेल कुठल्या त्रासासाठी लावायचे आहे त्यानुसार ते केव्हा लावावे याची वेळ बदलू शकते. नित्य अभ्यंगाकरता संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल अंघोळीच्या अर्धा ते पाऊण तास आधी संपूर्ण शरीराला तेल लावून नंतर अंघोळ करणे उत्तम. संतुलन शांती सिद्ध तेलासारखे तेल दिवसातून २-३ वेळा सांध्यामध्ये जिरवले तर चालू शकते. सांध्यांवर कुठल्याही प्रकारची सूज असल्यास मालिश केल्यास त्रास वाढू शकतो, पण हलक्या हाताने तेल जिरवल्यास मात्र सूज कमी व्हायलाही मदत मिळते. फार जोरात किंवा खसखस करून तेल लावणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते.

8) केसांचे आरोग्य नीट राहावे किंवा केसांत कोंडा होऊ नये या हेतूने तेल लावायचे असल्यास संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल शक्य असल्यास आदल्या रात्रीच केसांच्या मुळांना व स्काल्पवर हलक्या हाताने तेल लावणे अधिक उत्तम अन्यथा अंघोळीच्या आधी कमी कमी एक तास लावावे. स्काल्पमध्ये तेल जिरणे अत्यंत अवघड असते. संतुलन फार्मसीत संतुलन व्हिलेज हेअर बनविताना त्यात विशेष वनस्पतींचा उपयोग केला जातो, तसेच हे तेल बनविण्यासाठी विशेष पद्धत आहे.

केसांचे आरोग्य नीट राहण्याकरता तेल सिद्ध करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. पण तेल रात्री नीट झोप येण्यासाठी डोक्याला तेल लावायचे असल्यास तेल सिद्ध करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापरणे जास्त इष्ट असते. अशा प्रकारचे तेल रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर लावण्याचा सल्ला दिला जातो. संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेलासारखे २-४ थेंब तेल झोपण्यापूर्वी टाळूवर लावल्यास लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही व्यवस्थित झोप यायला मदत मिळतेअसा अनेकांचा अनुभव आहे.

9) लहान मुलांचे आरोग्य तसेच प्रतिकारशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी, त्यांनी बाळसे धरण्यासाठी अभ्यंग करण्याचा सल्ला दिला जातो. अगदी पहिल्या दिवसापासून बाळांना अभ्यंग करायला हरकत नसते. बाळाला अभ्यंग करत असताना गार वारे किंवा थंडी नसावी. बाळाला अभ्यंग करत असताना जास्त प्रमाणात जोर देता कामा नये. बाळाला जोराने रगडून तेल लावल्याने बाळाची ताकद वाढते असा गैरसमज बाहेरच्या स्त्रियांमध्ये असलेला दिसतो. बाळाला जोराने रगडून तेल लावल्याने बाळ मसाजचा आनंद तर घेत नाही, उलट रडारड होताना दिसते. त्यामुळे जेमतेम सव्वा महिना झाला की बाळाला मसाज करण्याचे थांबवले जाते.

त्यामुळे घरातील व्यक्तीने बाळाला व्यवस्थित मसाज केल्यास बाळ मसाजचा आनंद घेते. मसाज करताना बाळाशी गप्पाही मारलेल्या चांगले असते, बाळाला खेळवत खेळवत मसाज करावा. बाळाला हातात वा मांडीवर घेऊन मसाज करण्याऐवजी जमिनीवर गादी, चटईवर मऊ दुपटे वगैरे घालून मसाज करणे योग्य ठरते. बाळ भुकेले असताना मसाज करू नये तसेच बाळाचे खाणे झाल्यावर लगेचही मसाज करू नये. स्तन्यपानानंतर साधारण पाऊण-एक तासानंतर मसाज करणे योग्य असते. तेल लावल्यावर साधारण १५-२० मिनिटांनी बाळाला अंघोळ घालता येते. बाळाची तब्येत ठीक नसली म्हणजेच सर्दी, खोकला, ताप असा काही त्रास होत असला तर मसाज व अंघोळ टाळणेच बरे असते.

10) गर्भावस्थेत अंगाला तेल लावावे किंवा लावू नये याबद्दल मतमतांतरे असलेली दिसतात. गर्भवतीच्या एकंदर आरोग्याच्या दृष्टीने अंगाला तेल लावणे उत्तम असते. शक्यतो पहिल्या तीन महिन्यांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तेल लावावे. आम्ही संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल गर्भवतीचे पोट, पाठ, मांड्यांना हलक्या हाताने लावायला सांगतो, तसेच सुहृद तेलासारखे तेल स्तनांच्या मसाजसाठी पहिल्यापासूनच वापरणे उत्तम. चौथ्या महिन्यापासून गर्भावतीच्या संपूर्ण अंगाला तेल लावणे चांगले. गर्भावतीला तेल अगदी हलक्या हाताने लावावे. गर्भावतीला नियमित तेल लावण्याने पाय दुखणे, पायांत जडपणा येणे, पोटऱ्या दुखणे वगैरे त्रासांना प्रतिबंध व्हायला मदत मिळते. गर्भावतीला अशा प्रकारे अभ्यंग केल्याने प्रसूतीच्या वेळीही मदत होते. गर्भावतीला बसल्या बसल्या तेल लावणे चांगले.

11) खोबरेल तेल लावल्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला, सायनुसायटिससारखे त्रास होतात त्यांनी तिळाच्या तेलाचा वापर करणे अधिक बरे.

अशा प्रकारे अभ्यंग करताना विचारपूर्वक काळजी घेतली तर अभ्यंगाचा १०० % फायदा व्हायला मदत मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com