ब ‘बत्तीशी’ चा...!

अक्कलदाढ! का बरं ती तिरपी येते? का तिला काढावेच लागते?... असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आज अक्कलदाढेविषयी थोडे जाणून घेऊयात!
teeth
teethsakal

- डॉ. मनीषा गरुड, डॉ. सुमंत गरुड, अक्कलदाढ व जबड्याच्या सर्जरीचे तज्ज्ञ

अक्कलदाढ! का बरं ती तिरपी येते? का तिला काढावेच लागते?... असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आज अक्कलदाढेविषयी थोडे जाणून घेऊयात! आपण प्रथमदर्शनी कुठल्याही व्यक्तीशी त्याच्या बाह्यरूपावर आकर्षित होतो. त्यात बोलके पाणीदार डोळे आणि सुहास्य, निरोगी दात यांना खूप महत्त्व आहे. सुहास्यासोबतच दातांचा उपयोग अन्न नीट चावून पचण्या योग्य करण्यासाठी होतो. स्पष्ट शब्द उच्चार करण्यासाठी गालाचे व जबड्याचे स्नायू कार्यरत ठेवून तरुण दिसण्यासाठी होतो. सामान्यपणे पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीमध्ये १४ वरच्या जबड्यात, १४ खालच्या जबड्यात असे २८ दात असतात. म्हणजे प्रत्येक खाण्यात सात दात असतात. अक्कल दाढ ही आठव्या नंबरची दाढ, कोपऱ्यात येते, असे बत्तीस दात ज्याला आपण बत्तीशी देखील म्हणतो. अशा या बत्तीशीच्या चार दाढा वयाच्या १८ ते २१ वर्षाला येतात. याच वयात अक्कल येते असा समज आहे म्हणून याला अक्कल दाढ असेही म्हणतात.

शरीराची वाढ परिपूर्ण झाल्याचाही हा एक संकेत असतो. प्राचीन काळी किंवा आदिमानव युगात बराच कच्चा आणि नैसर्गिक आहार खाल्ला जायचा. त्याचे चर्वण नीट व्हावे म्हणून अक्कलदाढे ची गरज असायची. हळूहळू आपल्या आहारात बदल होत गेला आपण शिजवलेलं अन्न खाऊ लागलो आणि शरीराची एकंदर गरज कमी झाल्याने आकारमानही लहान झाले. जबडा छोटा झाला आणि मग त्यात अक्कलदाढ मावेनाशी झाली, तिला यायला जागा नसल्याने ती शेजारच्या दातांना ढकलू लागली. त्यामुळे दाढ दुखी, सूज, कान दुखणे ,डोके दुखणे अशा तक्रारी जाणवू लागल्या तेव्हा अक्कलदाढ काढण्याचा उपाय रुजू झाला. हा विषय आपण आता प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून समजून घेऊया...

सगळ्याच अक्कलदाढा काढाव्या लागतात?

नाही, ज्या सरळ येतात आणि खाण्यासाठी उपयोगी असतात त्या काढायला लागत नाही.

सगळ्या दुखणाऱ्या अक्कलदाढा काढाव्या लागतात का?

नाही, बरेचदा अक्कलदाढ येताना त्रास देते पण एकदा का सरळ आली की दुखणे थांबते. काहीवेळा अक्कलदाढे भोवती मांस वाढते ते कापून टाकल्याने देखील दाढ वरती येण्यात मदत होते.

सगळ्यांना अक्कलदाढा असतात का?

नाही, बऱ्याच जणांमध्ये हळूहळू अक्कलदाढ येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

सगळ्याच अक्कलदाढ हया सर्जरी करून काढाव्या लागतात का?

नाही, बऱ्याच अक्कलदाढा फक्त तिरप्या असतात आणि विशिष्टरित्या काढता येतात. पण ज्या दाढा हाडात रुतलेलया असतात, पूर्णपणे आडव्या असतात किंवा विरुद्ध दिशेला जातात त्या मात्र सर्जरी करूनच काढाव्या लागतात. अक्कलदाढ काढण्याआधी ‘ओपीजी’ नावाचा एक्सरे घेतला जातो, त्यावरुन अक्कल दाढ काढायची दिशा, रचना आणि खालच्या नसेची असणारी जवळीकता बघितली जाते. त्यानुसार उपचार पद्धती ठरवली जाते. अक्कलदाढ काढण्याआधी अँटिबायोटिक्स आणि वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. सर्जरी करून काढलेल्या जागी टाके दिले जातात. आठ दिवसांनी हे टाके काढता येतात. त्या काळात मऊ आणि थंड पदार्थ खाणे, दुसऱ्या बाजूने खाणे, कोमट पाण्याच्या चुळा भरणे अशा दिलेल्या सगळ्या सूचना पाळणे अनिवार्य आहे.

अक्कलदाढ काढताना संभाव्य धोका किंवा गुंतागुंत काय आहे?

दाढ खूप वाकडी असेल तर ती तुटू शकते. नसे च्या खूप जवळ असणारी दाढ काढताना ती जागा बधीर होऊ शकते. बऱ्याचदा शेजारची दाढ काढली जाते . जास्त दबाव वापरल्याने जबडा फॅक्चर होणे, अतिरक्तस्त्राव ह्या सगळ्या गुंतागुंती टाळण्यासाठी अनुभवी, विषयात तज्ञ, हातखंडाआणि कौशल्य असलेलया सर्जन ची आवश्यकता भासते.

जर मी अशी वाकडी त्रासदायक दाढ काढली नाही तर?

कुठल्याही आजारावर वेळीच उपचार केले नाही तर तो आजार शरीरात ठाण मांडून बसतो आणि बळावतो. अक्कलदाढेचेही तसेच आहे. वाकड्या दाढे मुळे चावण्यात अडथळा निर्माण होऊन गालाचे व जबड्याचे स्नायू शिथिल होतात. अशा तिरप्या दाढे मुळे गाल सतत चावला जातो न भरणारी जखम तयार होते. बऱ्याचदा अशा दाढे मुळे ब्रश न करता आल्याने अन्नकण साठवुन शेजारची म्हणजे सात नंबरची दाढ जी खाण्यासाठी उपयोगी असते ती कालांतराने काढावी लागते. तेव्हा सततच्या दुखणाऱ्या अक्कलदाढेकडे दुर्लक्ष करू नका. जर प्रथम तपासणी मध्ये दाढ काढण्याचा सल्ला् दिला असेल तर उपचारांची व्यवस्थित माहिती घेऊन योग्य तो निर्णय घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com