ब ‘बत्तीशी’चा (भाग २)

‘क्या आपके टूथपेस्ट मे नमक है’? अशा बऱ्याच जाहिराती बघून तुम्ही नक्कीच चक्रावून गेला असाल, पण नेमकी कोणती टूथपेस्ट वापरावी? आज आपण टूथपेस्टच्या प्रकारांविषयी जाणून घेऊया.
teeth
teethsakal
Summary

‘क्या आपके टूथपेस्ट मे नमक है’? अशा बऱ्याच जाहिराती बघून तुम्ही नक्कीच चक्रावून गेला असाल, पण नेमकी कोणती टूथपेस्ट वापरावी? आज आपण टूथपेस्टच्या प्रकारांविषयी जाणून घेऊया.

- डॉ. मनीषा गरुड, अक्कलदाढ व जबड्याच्या सर्जरीचे तज्ज्ञ

‘क्या आपके टूथपेस्ट मे नमक है’? अशा बऱ्याच जाहिराती बघून तुम्ही नक्कीच चक्रावून गेला असाल, पण नेमकी कोणती टूथपेस्ट वापरावी? आज आपण टूथपेस्टच्या प्रकारांविषयी जाणून घेऊया. निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छता ही खूप महत्त्वाची, मग ती शारीरिक असू दे किंवा मौखिक, त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व तर खुलते; पण आपल्याला शारीरिक फायदेदेखील होतात.

आपण जे अन्नपदार्थ नैसर्गिकरीत्या चावून-चावून खातो त्याने आपल्या हिरड्या बळकट होतातच; पण दातदेखील चमकदार राहतात. आता आहारात बराच बदल झाला आहे, स्निग्ध, मधुर, करबोदकयुक्त पदार्थ आपण सर्रास खातो. त्यामुळे एक प्रकारचे बुळबुळीत आवरण दातांवर चढते ते काही नैसर्गिकरित्या साफ होत नाही. अशा बुळबुळीत पृष्ठभागावर अन्नकण चिकटून राहतात आणि हळूहळू कठीण आवरण तयार होते. टूथपेस्ट ब्रश वापरून देखील जात नाही, म्हणूनच नियमित टूथपेस्ट वापरण्याचा प्रघात सुरू झाला.

सामान्यतः टूथपेस्ट मध्ये फेस निर्माण करणारा पदार्थ, रांगोळी प्रमाणे घर्षण निर्माण करणारी पावडर ,यांना बांधून ठेवणारे जेल आणि सगळ्या मिश्रणाला टिकाऊ बनवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह हे घटक असतात. यात काही अंशाने दात पांढरे शुभ्र बनवण्यासाठी किंवा दाढ दुखी साठी ,दात मजबूत करण्यासाठी असे वेगवेगळे पदार्थ मिसळले जातात. त्याप्रमाणे त्यांची गुणवत्ता बदलते आणि म्हणून आपल्याला योग्य कारणासाठी योग्य टूथपेस्ट वापरणं आवश्यक होते.

सर्वसामान्यतः पुढील प्रकारच्या टूथपेस्ट बाजारात उपलब्ध असतात

ऐंटी पलाक टूथपेस्ट

ही टूथपेस्ट दातांवरचे बुळबुळीत आवरण रोखण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे जिवाणू दातांवर आणि हिरड्यांवर राहत नाहीत तसेच अन्नकण चिटकूनदेखील राहत नाहीत. यात पायरो फास्फेट झिंक सायट्रेट त्रायक्लोसॅन अँटिबायोटिक आणि अँटी फंगल घटक असतात.

फ्लोराईड टूथपेस्ट

टूथपेस्ट निवडताना फ्लोराइड हा महत्त्वाचा घटक बघितला जातो. त्यामुळे दात मजबूत आणि कीडमुक्त राहतात.

डिसेन्सेटायझिंग टूथपेस्ट

दातांमध्ये थंड आणि गरम पदार्थांमुळे तीव्र सणक जाते ती कमी करण्यासाठी ही टूथ पेस्ट वापरली जाते. स्रटोनशीएम क्लोराईड हा त्याचा महत्त्वाचा घटक असतो.

व्हाइटनिंग टूथपेस्ट

दात पांढरे शुभ्र चमकदार होण्यास मदत होते. यात साबण युक्त पदार्थ आणि ब्लिचिंग एजंट चा वापर केला जातो.

नॅचरल टूथपेस्ट

ज्यांना केमिकलयुक्त टूथपेस्ट वापरायची नसते किंवा यातील काही घटकांमुळे ऍलर्जी असेल तर हर्बल टूथपेस्ट वापरली जाते. हर्बल टूथपेस्ट डब्ल्यू एच ओ प्रमाणित नसतात पण सुरक्षित असतात.

लहान मुलांसाठी वापरली जाणारी टूथपेस्ट

यात फ्लोराईड आणि कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते आणि त्यातील मधुर स्वादामुळे मुलांना ब्रश करण्यासाठी आकर्षित करते.

स्मोकर्स टूथपेस्ट

सिगरेट ओढाणाऱ्या बऱ्याच व्यक्तींमधे तांबडे पिवळे डाग दातांवर दिसतात. यात रांगोळी सारखा खरबडीत पदार्थ असल्याने घर्षणामुळे हे डाग जाण्यास मदत होते.

टूथपेस्टप्रमाणे टूथ ब्रशचे हार्ड, सॉफ्ट, मीडियम, दातांच्या फटीतील घाण साफ करणारे, ऑर्थोडोंटिक ब्रेसेस लावलेले टूथब्रश, लहान मुलांचे ब्रश असे अनेक प्रकार असतात. नैसर्गिक लिंबाच्या काड्या ज्येष्ठमधाच्या काड्या चावून चोथा करून दात साफ करण्याची पद्धत पूर्वापार पासून प्रचलित आहे. या संकल्पनेतूनच नरम प्लास्टिकची चुई टूथ ब्रश बाजारात उपलब्ध आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

  • तोंडाला दुर्गंधी न येण्यासाठी माऊथ वॉशचा वापर करावा.

  • ब्रश करताना जीभ स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी टंग क्लिनर वापरता येते.

  • बऱ्याचदा दातांच्या फटींमध्ये अन्नकण अडकून राहतात, ते स्वच्छ करण्यासाठी फ्लॉस वापरला जातो.

  • दिवसातून दोन वेळा दात घासणे महत्त्वाचे असते.

  • दात आडव्या पद्धतीने न घासता उभ्या पद्धतीने दात घासावेत, त्यामुळे फटीतील अन्नकण निघून जाण्यास मदत होते.

  • ब्रश करून झाल्यावर जिभेने सगळीकडे फिरवून बघावे जर अजूनही गुळगुळीत वाटत असल्यास परत थोडी टूथपेस्ट घेऊन ब्रश करावे.

  • प्रत्येक जेवणानंतर चुळा भराव्या.

  • गोड, चिकट, अतितेलकट पदार्थ टाळावे.

  • सहा महिन्यातून एकदा डेंटिस्ट ला दाखवावे.

  • दाढ दुखी असेल अंगावर न काढता डेंटिस्ट कडून योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com