प्रश्नोत्तरे

आम्ही संतुलनचे सर्व प्रॉडक्ट्स आमच्या बाळासाठी वापरतो व त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. आम्ही बाळाला बालामृतदेखील देतो आणि तो ते आवडीने खातो.
प्रश्नोत्तरे
Summary

आम्ही संतुलनचे सर्व प्रॉडक्ट्स आमच्या बाळासाठी वापरतो व त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. आम्ही बाळाला बालामृतदेखील देतो आणि तो ते आवडीने खातो.

आम्ही संतुलनचे सर्व प्रॉडक्ट्स आमच्या बाळासाठी वापरतो व त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. आम्ही बाळाला बालामृतदेखील देतो आणि तो ते आवडीने खातो. पण कालच डॉक्टर म्हणाले की बाळाला मध देऊ नये, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते, तर मग बालामृत आईच्या दुधातून दिले तर चालेल का? याबाबत संभ्रम आहे. कृपया मार्गदर्शन करावे

- केतकी पटवर्धन (बंगलोर)

उत्तर - आयुर्वेदामध्ये मध नवजात बालकासाठी उत्तम मानले जाते. आईच्या दुधापूर्वी देखील तुम्ही बाळाला मध आणि तुपाचे चाटण देऊ शकता. बालामृत मधाबरोबर दिल्यास त्यातील सोनं, केशर इत्यादी घटकांचे योग्य पचन आणि शरीरातील त्याचा वापर होण्यास मदत होते ! त्यामुळे चांगल्या प्रतीचा मध बाळाला देण्यात काहीच हरकत नाही. आईच्या दुधातून बालामृत दिल्यास चालेल पण त्याला मधाची जोड मिळाल्यास अधिक उत्तम. मधा बद्दलचे गैरसमज दूर करण्याकरिताचा व्हिडिओ आपण यु-ट्यूबवरील Dr. Malvika Tambe यांच्या चॅनेलवर पाहू शकता.

पौष्टिक मिश्र डाळ...

पाककृतीस लागणारे साहित्य :

मसूर डाळ - १०० ग्रॅम

मूग डाळ - १०० ग्रॅम

हरबरा डाळ - २० ग्रॅम

उडीद डाळ - २० ग्रॅम

गरम पाणी - १ लिटर

साजूक तूप - ४० ग्रॅम

जिरे - २ ग्रॅम

हिंग - १ ग्रॅम

हळद - २ ग्रॅम

कढीपत्ता - ८-१० पाने

तिखट - २ ग्रॅम

आल्याची पेस्ट - १६ ग्रॅम

लसूण पेस्ट - ७ ग्रॅम

लिंबाचा रस - १० ग्रॅम

मीठ - १७ ग्रॅम

कोथिंबीर - १० ग्रॅम

कृती :

१. सर्व डाळी पाणी घालून स्वच्छ धुवून घ्याव्या.

२. जाड बुडाच्या पातेल्यात (किंवा कुकरमध्ये) तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालावे. जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, आल्या- लसणाची पेस्ट, तिखट या गोष्टी एकामागून एक घालाव्या.

३. धुतलेल्या डाळी फोडणीवर टाकून २-३ मिनिटे परताव्यात. गरम पाणी टाकून मीठ टाकावे. पाणी साधारण अर्धे उडून जाईपर्यंत पातेल्यावर झाकण न ठेवता मंद आचेवर डाळी शिजवाव्यात. नंतर पातेल्यावर झाकण ठेवून साधारण डाळी मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवाव्यात (यासाठी साधारण २० मिनिटे लागतात किंवा कुकरची एक शिट्टी).

४. वाढण्यापूर्वी लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com