
आमच्या घरात लवकर केस पांढरे होण्याची प्रवृत्ती आहे. माझ्या मुलीचे वय १५ वर्षे आहे. तिचेही केस तुरळक पांढरे होत आहेत.
आमच्या घरात लवकर केस पांढरे होण्याची प्रवृत्ती आहे. माझ्या मुलीचे वय १५ वर्षे आहे. तिचेही केस तुरळक पांढरे होत आहेत. यावर आयुर्वेदात काही उपाय करता येतात का?
- सरिता नायक, सिंधुदुर्ग
उत्तर : सध्या ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते, पण योग्य आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम गुण येतो असाही अनुभव आहे. मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा तूप व पाव चमचा मध हे मिश्रण देण्याचा, सकाळ-संध्याकाळ १-१ हेअर सॅन गोळ्या देण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून किमान २-३ वेळा व्हिलेज हेअर तेल लावणे, रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने न वापरता न्हाण्यासाठी रिठा, शिकेकाई, त्रिफळा वगैरे द्रव्यांपासून बनविलेले मिश्रण किंवा तयार संतुलन सुकेशा हेअर वॉश वापरणे आवश्यक. केसांना आतून ताकद मिळावी यासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे, सॅन रोझ रसायन घेणे हेसुद्धा उत्तम.
माझ्या मुलाची त्वचा लहानपणापासून खूप कोरडी आहे. कितीही क्रीम्स लावल्या तरी उपयोग होत नाही. थंडीच्या दिवसांत तर त्वचा इतकी कोरडी होते की खाज येते. कृपया काही उपाय सुचवावा.
- प्रमोद कुलकर्णी, मुंबई
उत्तर : त्वचा ही संपूर्ण शरीराची सारस्वरूप असते, त्यामुळे बाहेरून क्रीम वगैरे लावण्याबरोबरीने आतून त्वचेला योग्य पोषण मिळेल, स्निग्धता मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. यादृष्टीने मुलाला रात्रभर भिजवलेले ३-४ बदाम उगाळून केलेली पेस्ट रोज सकाळी देणे, पंचामृत देणे चांगले. आहारात अन्नासमवेत किमान २-२ चमचे तूप देण्याचाही उपयोग होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपताना अंगाला अभ्यंग करणे आणि सकाळी साबणाऐवजी सॅन मसाज पावडर हे उटणे व मसुराचे पीठ यांचे समभाग मिश्रण वापरणे. या उपायांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे चांगले.