प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

मला दोन महिन्यांपूर्वी कोविड व दोन महिन्यांनंतर डेंग्यू झाला होता. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.

प्रश्नोत्तरे

मला दोन महिन्यांपूर्वी कोविड व दोन महिन्यांनंतर डेंग्यू झाला होता. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. तेव्हापासून भूक लागत नाही, पचन नीट होत नाही, शौचाला पातळ होते, जेवायची इच्छा होत नाही, अंग दुखते, खूप थकवा जाणवतो. कृपया मार्गदर्शन करावे.

- सचिन मोविडकर, पुणे

उत्तर - असे त्रास असणाऱ्या सध्या अनेक व्यक्ती दिसतात. अपचन व पित्ताचे असंतुलन या तक्रारींसाठी रात्रभर कपभर पाण्यात एक चमचा धणे भिजत घालून, दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून, घेऊन त्यात खडीसाखर घालून रोज नियमितपणे घ्यावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला तसेच थकवा कमी व्हायला मदत मिळेल. संतुलन पित्तशांती गोळ्या, संतुलन अन्नयोग गोळ्या तसेच सॅनकूल चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. रोज पादाभ्यंग (तळपायाला पादाभ्यंग घृतासारखे तूप लावून शुद्ध काशाच्या वाटीने तळपाय घासणे) करण्याचाही फायदा मिळू शकेल. आहार हलका असावा व त्यात साजूक तुपाचा नक्की समावेश असावा. बिल्वसॅनसारखे रसायन घेण्याचाही फायदा मिळू शकेल. जरूर पडल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उपचार घेण्याने आपला त्रास बरा होऊ शकेल.

माझ्या बहिणीला वर्षापूर्वी थायरॉइडचा त्रास असल्याचे आढळले आहे. तिचे वजन वाढते आहे व मान खूप काळी झालेली आहे. या दोन्ही त्रासांसाठी काय उपचार करता येईल?

- मालती करमरकर, अहमदनगर

उत्तर - शरीरात हॉर्मोन्स तसेच अग्नीचे असंतुलन असल्यास अवाजवी वजन वाढते तसेच त्वचा, केस, हाडे वगैरेंवरही परिणाम झालेला दिसतो. यासाठी शरीरातील त्रिदोषांमध्ये संतुलन आणणे सर्वांत महत्त्वाचे ठरते. याकरता योग्य उपचारांबरोबर पंचकर्माची योजना करणे आवश्यक असते. मानेला रोझ संतुलन रोझ ब्यूटी तेलासारखे सिद्ध तेल लावण्याचा उपयोग होईल. तसेच वजन कमी होण्याकरता संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल आठवड्यातून किमान ४-५ वेळा स्नानापूर्वी किमान अर्धा तास लावावे. वात व पित्ताच्या संतुलनाकरता संतुलन पित्तशांती, संतुलन मंजिष्ठासॅन, संतुलन यू. सी. चूर्ण वगैरे औषधे घेणे उत्तम. नियमाने रोज रोज ३०-४० मिनिटे चालणे, १०-१५ मिनिटे प्राणायाम करणे उत्तम ठरेल.

Web Title: Question And Answer 29th April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newsFamily Doctor
go to top