प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

माझे वय ३२ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे उन्हात गेले की मला लगेचच खाज सुटायला लागते व त्वचा काळवंडायला लागली आहे.

प्रश्नोत्तरे

प्रश्न - माझे वय ३२ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे उन्हात गेले की मला लगेचच खाज सुटायला लागते व त्वचा काळवंडायला लागली आहे. फक्त चेहरा व हात इथेच आम्हाला फरक दिसतो, बाकी त्वचा सावळी असली तरी उजळ आहे. कृपया यासाठी उपाय सुचवा.

- सौ. मानसी काळे, मंचर

त्वचेचे विकार हे सहसा शरीरामधील रक्तात असलेल्या अशुद्धीमुळे असू शकतात. सध्या सगळीकडे अॅलर्जीचे प्रकार वाढायला लागले आहेत. अन्य कुठलेही त्रास पित्ताशी संबंधित आहे का, हे तुमच्या पत्रावरून समजू शकलेले नाही. रक्ताच्या शुद्धीकरता मंजीसार किंवा महामंजिष्टादीसारखा एखादा काढा मंजिष्टसॅन, पित्तशांती सारख्या गोळ्या घेण्याने मदत होऊ शकेल. तसेच त्वचेच्या दृष्टीने चेहऱ्यावर संतुलन रोजब्युटी तेल रोज रात्रीच्यावेळी लावणं व संतुलन अभ्यंग कोकोनट तेल संपूर्ण अंगाला लावण्याचा होईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे व तसेच संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी केल्यास अशाप्रकारचा त्रास पटकन बरे व्हायला मदत होते.

प्रश्न - मला गेली १० वर्षे आम्लपित्ताचा त्रास होत आहे. काहीही खाल्ले की पोटातून ॲसिड वर आल्यासारखे वाटते. तसेच, छातीमध्ये जळजळ होते. ऐंटासिड घेतली की तात्पुरते बरे वाटते, मात्र पुन्हा अपचनाचा त्रास होतो. तसेच पोटही साफ होत नाही. त्यासाठी मला काही उपाय सुचवावा.

- शुभांगी पाटकर, पुणे

अपचन व आम्लपित्त हे दोन्ही त्रास एकमेकांना मदत करणारे असतात. त्याच बरोबरीने ऐंटासिड घेण्याची सवय लागल्यास अपचन त्यामुळे वाढते. त्यामुळे आम्लपित्ताचाही त्रास होतो. यासाठी आपल्याला पचनावर काम करणे महत्त्वाचे असते. रोज जेवल्यानंतर कमीतकमी संतुलन अन्नयोगसारख्या गोळ्या व संतुलन पित्तशांती सारख्या गोळ्या अगदी नियमाने घेण्यास सुरुवात करावी. जेवण सात्त्विक असावे. शक्यतो तेलकट, तिखट पदार्थ व आंबवलेले पदार्थ आहारातून टाळलेलेच बरे.

अधूनमधून भूक लागत असेल तर मुठभर लाह्या किंवा लाह्यांचे पाणी, आमसुलाचे सरबत, किंवा नारळाचे पाणी घेणे हितकारक. त्यामुळे अपचनाचा त्रासही होणार नाही आणि शरीरातील पित्त शमन होण्यास मदत होईल. रात्री वेळेवर झोपून ती पुरेशी घ्यावी. सकाळी लवकर उठून थोड्या प्रमाणामध्ये व्यायाम करणे पचनासाठी महत्त्वाचे असते. पोट साफ होण्यासाठी रोज रात्री सॅनकूल चूर्ण घेतल्याचाही फायदा होतो. अशाप्रकारे दीर्घकाळ त्रास होत असल्यास शरीराची शुद्धी करून पित्ताचे शोधन केलेले उत्तम. शास्त्रोक्त पंचकर्म संतुलन, विरेचन बस्ती हे उपचार केल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Question And Answer 8th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctorhealth