esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे

आम्ही उभयतांनी ‘संतुलन आयुर्वेद’मधून उपचार करून घेतले आहेत. आम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झाला. सध्या आमचे बाळ आठ महिन्यांचे आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत तरी बाळाला ‘बेबी मसाज’ तेल लावावे की ‘बेबी क्रीम’ लावावे? कृपया मार्गदर्शन करावे. ..... नितीन 
सर्वप्रथम आपले अभिनंदन. थंडीच्या दिवसात वातावरणात कोरडेपणा वाढतो त्यामुळे त्वचाही कोरडी होते. लहान मुलांची त्वचा तर खूपच नाजूक असते. या दृष्टीने स्नानापूर्वी ‘संतुलन बेबी मसाज सिद्ध तेल’ लावणे, स्नानासाठी ‘बेबी मसाज पावडर’ हे उटणे वापरणे, आणि स्नानानंतर ‘संतुलन बेबी क्रीम’ लावणे हे सर्वोत्तम होय. बरोबरीने ‘संतुलन बालामृत’, ‘संतुलन बाळगुटी’, ‘सॅन अंजन (काळे)’ वापरणे श्रेयस्कर. 


मी ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे पुस्तक वाचले आहे व त्यातील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेते आहे. मी सध्या सहा महिन्यांची गरोदर आहे. मला सुरुवातीपासून कधीच उलटी, जेवायची इच्छा न होणे वगैरे त्रास झाले नाहीत किंवा विशेष असे डोहाळेही लागले नाहीत. हे योग्य आहे का? कृपया मार्गदर्शन करावे. 
...... अरुंधती 
उलटी, जेवायची इच्छा न होणे हे त्रास न होणे चांगलेच आहे. स्त्रीसंतुलन चांगले असले, मुळातील प्रकृती चांगली असली की गरोदरपणामुळे शरीरात होणारे बदल त्रासदायक ठरत नाहीत, पर्यायाने या प्रकारची लक्षणे उद्भवत नाहीत. तेव्हा त्रास झाला नाही, याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. डोहाळे हे सुद्धा आतल्या जिवाच्या आवडी-निवडीशी संबंधित असल्याने काही स्त्रियांना ठळकपणे जाणवतात, काहींना कमी जाणवतात. शिवाय सध्या डोहाळे हा शब्द सहसा खाण्या-पिण्याच्या इच्छांशी संबंधित असलेला दिसतो. गर्भातील अपत्याला काहीतरी वेगळे करायची, विशिष्ट ठिकाणी जाण्याची, वेगळे वाचन किंवा संगीत ऐकण्याची इच्छा होत असली तर ते सुद्धा डोहाळेच होत. डोहाळे लागले तर ते पुरवायला हवेत, पण लागले नाहीत तर चिंता करण्याची गरज नाही. 

माझ्या पत्नीचे दोन महिन्यांपूर्वी बाळंतपण झाले. तिचे रक्‍त खूप कमी आहे, तसेच अशक्‍तपणा खूप आहे. तिचे वजनही कमी आहे. कृपया काही टॉनिक सुचवावे.              ... हरिसिंग 
 बाळंतपणानंतर सर्वच स्त्रियांना काहीतरी शक्‍तिवर्धक रसायन घेणे आवश्‍यक असते. रक्‍तवाढीसाठी, नैसर्गिक कॅल्शियम मिळण्यासाठी आहारयोजना कशी करावी, कोणकोणती रसायने-औषधे घ्यावीत याचे विस्तारपूर्वक मार्गदर्शन ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकातून मिळेलच. थोडक्‍यात सांगायचे तर शतावरी कल्प घालून दूध, ‘सॅनरोझ’ रसायन, ‘लोहित प्लस’ गोळ्या सुरू करणे, अंगाला नियमित अभ्यंग करणे, रोज एक डिंकाचा लाडू, सात-आठ काळ्या मनुका, अंजीर तसेच तुपासह खजूर खाणे सुद्धा चांगले. यामुळे हळूहळू वजन वाढण्यासही मदत मिळेल. 

माझ्या पतीला तळहातावर व पायाच्या घोट्याजवळ एक्‍झिमा आहे. संतुलनचे वाय्‌. एस्‌. ऑइंटमेंट लावले की त्यांना बरे वाटते. याबरोबरीने अजून काय औषध घ्यावे किंवा पथ्य सांभाळावे?  ..... सय्यद 
एक्‍झिमा हा रक्‍तधातूच्या अशुद्धीतून होणारा एक रोग आहे. यावर बाहेरून वाय्‌. एस्‌. ऑइंटमेंट लावणे उत्तम आहेच, बरोबरीने ‘संतुलन मंजिसार’ आसव, ‘अनंत सॅन’ व ‘संतुलन पित्तशांती’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी एक चमचा पंचतिक्‍त घृत हे औषधी तूप घेण्याचाही उपयोग होईल. पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेणे हे सर्वोत्तम होय. तेल, मांसाहार, अंडी, तिखट, तेलकट पदार्थ, ढोबळी मिरची, वांगे, गवार, अळू, कोबी-फ्लॉवर, दही, चीज, पनीर या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर. 

सकाळ फॅमिली डॉक्‍टर’ ही माझी आवडती पुरवणी आहे. मला डोकेदुखीचा त्रास होतो, त्यावेळी मळमळते. लिंबू-पाणी घेतल्यावर बरे वाटते. यावर काही उपाय सुचवावा.              ... स्नेहल 
 सकाळी उठल्यावर ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. शक्‍य होईल तेव्हा गोड डाळिंबाच्या दाण्यांवर थोडे मीठ व मिरपूड लावून चावून खाण्याचा उपयोग होईल. चिंच, टोमॅटो स्वयंपाकातून वर्ज्य करून लिंबू, कोकम, किंवा मोठा आवळा वापरणे चांगले. डोके दुखणार असे वाटले की जितक्‍या लवकर मानेवर, तसेच टाळूवर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावता येईल, तितका डोकेदुखीचा त्रास टाळता तरी येतो किंवा त्रासाची तीव्रता कमी होऊ शकते असा अनुभव आहे. दुपारी झोपणे, तसेच रात्रीची जागरणे टाळणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचाही चांगला उपयोग होईल.