प्रश्नोत्तरे

‘फॅमिली डॉक्टर’ अविरत चालू ठेवल्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद. आम्हाला यातील मार्गदर्शनाचा आजवर खूप फायदा झालेला आहे.
प्रश्नोत्तरे
Summary

‘फॅमिली डॉक्टर’ अविरत चालू ठेवल्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद. आम्हाला यातील मार्गदर्शनाचा आजवर खूप फायदा झालेला आहे.

‘फॅमिली डॉक्टर’ अविरत चालू ठेवल्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद. आम्हाला यातील मार्गदर्शनाचा आजवर खूप फायदा झालेला आहे. माझी नात अमेरिकेत असते. ती अडीच वर्षांची आहे. गर्भसंस्कार केलेले असल्यामुळे तिची एकंदर प्रगती तसेच तब्येत उत्तम आहे. फक्त ती अजून बोलत नाही, कृपया यावर काही उपाय सुचवावा.

- वैशाली मांगडे

उत्तर - ‘फॅमिली डॉक्टर’चा उपयोग झाल्याचे कळवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. नातीला संतुलन बालामृत देत असालच, बरोबरीने रोज ४-५ थेंब ब्रह्मलीन घृत देण्याचाही उपयोग होईल. बरोबरीने वेखंड, जटामांसी, अक्कलकरा यांचे समभाग मिश्रण करून त्यातील एक चिमूटभर चूर्ण मधात मिसळून जिभेवर चोळण्याचा उपयोग होईल.

श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे ॐकार गणेश हे संगीत रोज ऐकवण्याचाही फायदा होऊ शकेल. आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकातील मार्गदर्शनानुसार अंगाला नियमित अभ्यंग, टाळूवर संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेल, डोळ्यांत सॅन अंजन (काळे) वगैरे उपाय योजणेही श्रेयस्कर.

माझे वय २७ वर्षे असून कामानिमित्त मला मोबाइल तसेच साध्या फोनवर सतत बोलावे लागते. गेल्या ५-६ महिन्यांपासून सलग २-३ तास फोनवर बोलल्यानंतर माझ्या कानात दुखण्यास सुरुवात होते. कानांच्या डॉक्टरांकडून तपासून घेतले असता ते कानात काही बिघाड नसल्याचे सांगतात. यावर काही उपाय सुचवावा ही विनंती.

- अवधूत दाबके

उत्तर - कान हे वातदोष राहण्याचे एक मुख्य ठिकाण असते. त्यामुळे फोनमधील रेडिएशनच्या अतिरेकामुळे हा त्रास होतो आहे. मोबाइलचा वापर अपिहार्य असला तरी त्यातील रेडिएशनपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वायरसहित हेडफोन्स वापरणे शक्य आहे. साधा फोनसुद्धा वायरसहित असणारा वापरणे अधिक चांगले.

या बरोबरीने रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही कानांत संतुलन श्रुती तेलाचे २-३ थेंब आणि नाकात नस्यसॅन घृताचे २-३ थेंब टाकणे आवश्यक. आठवड्यातून एकदा, यानुसार ४-५ आठवड्यांसाठी पंचकर्म केंद्रात शास्त्रशुद्ध पद्धतीने कर्णपूरण हा विधी करून घेण्याचाही उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com