
प्रश्नोत्तरे
प्रश्र्न १ : माझे वय ४० वर्षे असून माझी त्वचा गेल्या काही वर्षांपासून कोरडी आणि काळवंडली आहे. कितीही क्रीम लावली तरी काही उपयोग होत नाही. कृपया यावर काही उपाय सुचवावा.
उत्तर : त्वचा काळवंडणे किंवा कोरडी पडणे हे वातदोष वाढल्याचे लक्षण आहे. यावर फक्त मॉईश्र्चरायझिंग क्रीम लावणे पुरेसे ठरणार नाही. तर वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी आतून-बाहेरून प्रयत्न करायला हवेत. यादृष्टीने नियमित अभ्यंग करणे, स्नानाच्या वेळी साबणाऐवजी वातशामक व रक्तशुद्धीकर द्रव्यांपासून बनविलेले उटणे, उदा. सॅन मसाज पावडर व मसूर पीठ हे मिश्रण वापरणे, सकाळी नाश्त्यापूर्वी पंचतिक्त घृत नावाचे त्वचेतील दोष दूर करून कांती उजळवणारे औषधी तूप घेणे, संतुलन शतानंत कल्प टाकून दूध घेणे, आहारात कमीत कमी ४-५ चमचे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे हे उपाय योजता येतील. ढोबळी मिरची, वांगे, गवार, अंडी, कोबी, फ्लॉवर, राजमा, वाटाणे, शीतपेये वगैरे गोष्टी आहारातून टाळणे हेसुद्धा श्रेयस्कर ठरेल.
प्रश्र्न २ : माझ्या बहिणीचा मुलगा पाच वर्षांचा असून तो खूप दंगामस्ती करतो. जागा असताना एक क्षणभरही स्वस्थ बसत नाही. डॉक्टरांनी हायपर ॲक्टिव्ह असल्याचे सांगितले आहे. घरातल्या एकाला त्याच्याबरोबर सतत असावेच लागते. शाळेतही अजिबात लक्ष देत नाही. यावर काही उपाय असल्यास सुचवावा. - श्रीमंत कवाडे
उत्तर : आजकाल अनेक मुलांमध्ये ही समस्या आढळते आहे. शरीर-मनाची ही अतिचंचलता किंवा सैरभैर अवस्था आटोक्यात आणण्यासाठी आयुर्वेदाच्या उपचारांचा चांगला फायदा होतो असे दिसते. बहिणीच्या मुलाला सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा ब्रह्मलीन घृत देण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी अंगाला अभ्यंग करण्याचा आणि टाळूला ३-४ थेंब संतुलन ब्रह्मलीन तेल जिरविण्याचाही फायदा होईल. अमृतशर्करायुक्त पंचामृत, संतुलन शतावरी कल्पयुक्त दूध वगैरे गोष्टी शक्ती वाढवून वात कमी करण्यास पर्यायाने मनाची सैरभैर अवस्था, शरीराची चंचलता कमी करण्यास सक्षम असतात. सुवर्णसिद्ध जल पिणे, श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या सोमध्यानातील ज्योतिध्यान करणे, ॐकार गणेश या अल्बममधील रचना ऐकवणे याचाही उत्तम परिणाम होताना दिसतो. या सर्व उपायांचा उपयोग होईलच, बरोबरीने प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन औषधोपचार सुरू करणे अधिक श्रेयस्कर ठरेल.