esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझे बाळंतपण होऊन दोन वर्षे झाली. नियमित अभ्यंग तेल वापरण्याने माझे वजन पूर्ववत झाले, पोटही आत गेले. गेल्या दोन महिन्यांपासून कामाचा ताण आला तर पाठ दुखते. कृपया काही उपाय सुचवावा?

- सौ. मधुरा पतंगे

उत्तर : बाळंतपणानंतर वाढणारा वातदोष कमी करण्यासाठी नियमित अभ्यंग सर्वश्रेष्ठ असतो, याने वजनही कमी होतो, बांधा पूर्ववत होतो, शरीरशक्ती सुद्धा सुधारते. पाठ दुखते त्यावर संतुलन वातबल गोळ्या घेण्याचा तसेच पाठीला संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल लावण्याचा उपयोग होईल. कामाचा ताण आला की अंगावरून पांढरे जाण्यामुळे कंबर-पाठ दुखते असे बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत आढळते. असे असल्यास बरोबरीने फेमिसॅन सिद्ध तेल वापरण्याचा आणि अशोक ॲलो सॅन गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. एक चमचा खारकेचे चूर्ण व पाव चमचा डिंकाची लाही टाकून उकळलेले कपभर दूध रोज सकाळी घेण्याचाही फायदा होईल.

माझी मुलगी दोन वर्षांची आहे. आम्ही सर्व गर्भसंस्कार केले होते, त्याचा खूप फायदा झालेला दिसतो. मुख्य म्हणजे आम्ही दोघे सावळे आहोत, माझ्या पत्नीने अमृतशर्करा टाकून बनविलेले पंचामृत घेण्याने आमच्या मुलीचा रंग खूप उजळ व आकर्षक आहे. गेल्या १५ दिवसांपासून ती रात्री नीट झोपत नाही, दचकून उठते, कधी कधी रडते. कृपया यासाठी काही उपाय सुचवावा?

- श्री. प्रकाश चावरे

उत्तर - गर्भसंस्कारांचा फायदा झाल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. अमृतशर्करेमधील सुवर्णवर्ख आणि केशर यामुळे रंग उजळण्यास मदत मिळते. मुलीला शांत झोप यावी यासाठी संपूर्ण अंगाला संतुलन बेबी मसाज तेल लावण्याचा उपयोग होईल. टाळूवर ब्रह्मलीन तेल लावणे, कानात १-१ थेंब श्रुती तेल टाकणे सुद्धा चांगले. ज्या खोलीत ती झोपते तेथे अगोदर संतुलन सुरक्षा किंवा प्युरिफायर धूप करणे, रामरक्षा म्हणणे किंवा ऐकणे सुद्धा चांगले. काही दिवस झोपण्यापूर्वी पाव चमचा सॅन रिलॅक्स सिरप देण्याचाही फायदा होईल.

फॅमिली डॉक्टर सदर पुन्हा सुरू केल्याबद्दल आभार. आम्ही सर्व जण गेल्या वर्षापासून सॅन अमृत चहा घेतो. आणि त्याचा खूपच फायदा झालेला आहे. कोरोना होणे तर दूरच, पण या दीड वर्षांत आमच्या घरात कुणाला सर्दी, खोकला, ताप सुद्धा आलेला नाही. सॅन अमृत दीर्घकाळ घेतला तर चालतो का? माझी मोठी मुलगी त्यात थोडे लिंबू पिळून घेते, तर हे योग्य आहे काय?

- सौ. जयश्री कुलकर्णी

उत्तर : सॅन अमृत चहामध्ये लिंबू किंवा खडीसाखर टाकून घेतले तरी चालते. आपल्यासारखा अनुभव आत्तापर्यंत अनेकांनी घेतला आहे. आत्मसंतुलनमध्ये राहणाऱ्या आणि येथे कामाला येणाऱ्या सर्वांचा हाच अनुभव आहे. प्रतिकारशक्ती चांगली राहावी, रक्तशुद्धी व्हावी, फुप्फुसे कार्यक्षम राहावीत यादृष्टीने अनेक द्रव्यांची योजना करून सॅन अमृत हर्बल ब्रू बनविलेला आहे. हा चहा दीर्घकाळ, अगदी कायम घेतला तरी चालतो. यामुळे कोणताही त्रास होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. दहा वर्षाखालील मुलांना निम्म्या प्रमाणात म्हणजे अर्धा कप देता येतो.

loading image