
प्रश्नोत्तरे
मी फॅमिली डॉक्टरचा नियमित वाचक आहे. संतुलनची बरीच औषधे व रसायनेही मी नियमित वापरतो व मला त्याचा उत्तम फायदा होतो. माझी मित्रमंडळी मला संतुनलचा प्रचारक म्हणून चिडवतात. काही व्यक्ती मात्र तुमच्या उत्पादनांमध्ये फार प्रमाणात साखर आहे या कारणामुळे खाण्याचा कंटाळा करतात. जसे की सिरप अत्यंत गोड असतात, दुधातून कल्प घेतले तर दूध फार गोड लागते. याकरता मी लोकांना काय सांगू शकतो किंवा या उत्पदनांमधील गोडी कमी होऊ शकेल का? तसेही सध्या साखर खाऊ नका असा प्रचार सगळीकडे होत आहे. कूलसॅन सिरप, गुलकंद स्पेशल, धात्री रसायन वगैरे मी नियमित घेत असतो त्यामुळे माझ्या कुटुंबातील मंडळीही चिंतित असतात. कृपया मार्गदर्शन करावे.
- दीपक मेहता, दिल्ली
उत्तर - नैसर्गिक साखर आपल्या आरोग्याकरता महत्त्वाची असते. कुठलेही सिरप तयार करताना वनस्पतींच्या काढ्यात साखरेचा पाक करून टाकला जातो. अशाच प्रकारचा पाक मुरांबा वगैरे करतानाही टाकला जातो, जेणेकरून त्यात कुठल्याही प्रकारची प्रिझर्वेटिव्हज् टाकण्याची गरज नसते अर्थात आपल्याला रासायनिक प्रिझर्वेटिव्हज् चे दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत. तसेच साखर औषध पचायला सुद्धा मदत करते. चव फार गोड वाटत असली तर सिरप घेताना त्यात पाणी मिसळता येते. दुधात कल्प घालताना कल्पाचे प्रमाण थोडे कमी करता येऊ शकते. साखर उचित प्रमाणात खाणे हे आरोग्याकरता अत्यंत महत्त्वाचे असते फक्त ती साखर नैसर्गिक असली तर जास्त उत्तम ठरते. कृपया यूट्यूब चॅनेल ‘डॉ. मालविका तांबे’ यांचा ‘साखरे’चा व्हिडिओ पाहिल्यास बऱ्याचशा शंकांचे निरसन होऊ शकेल.
माझे वय ६४ वर्षे आहे. बऱ्याच दिवसांपासून थोडे धूसर दिसत असल्यामुळे मी डॉक्टरांना दाखवले असता लवकरच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागू शकेल असे सांगितले आहे. मला शस्त्रक्रियेची खूप भीती वाटते. शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार करता येतील का ?...
- अर्चना दिघे, पुणे
उत्तर - वय वाढते तसे प्रत्येक अवयवात कुठला ना कुठला दोष येतो. वय वाढल्यावर केस पांढरे होतात तसेच डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होणे स्वाभाविक असते. याकरता पुढे मागे कधीतरी शस्त्रक्रिया करवीच लागते. मात्र, आधीपासून डोळ्यांची काळजी घेतली तर मोतीबिंदू होण्याचा वेग कमी करता येऊ शकेल, जेणेकरून थोडे दिवस मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लांबवता येऊ शकेल. यासाठी डोळ्यांमध्ये नियमितपणे आयुर्वेदिक रित्या तयार केलेले अंजन घालायला सुरुवात करावी. आवडत असल्यास संतुलनचे काळे अंजन घालावे, डोळ्यांत काळेपणा आवडत नसल्यास संतुनलचे क्लिअर अंजन वापरता येईल.
तसेच रोज डोळ्यांमध्ये संतुलन सुनयन तेलाचे १-१ थेंब टाकावे. डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवण्याचाही फायदा होताना दिसतो. डोळ्यांना अतिरिक्त उष्णतेपासून वाचवावे. स्क्रीन टाइम कमी करावा म्हणजे मोबाईल पाहणे, टीव्ही पाहणे कमी करणे उत्तम. डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आयुर्वेदात वेगवेगळ्या औषधांची संकल्पना सांगितलेली आहे, त्यानुसार रोज संतुलन सुनयन घृत घेणे फायदेशीर ठरू शकेल, जमल्यास अर्धा चमचा उत्तम प्रतीचे त्रिफळा चूर्ण कपभर पाण्यात भिजवावे, सकाळी पातळ वस्त्रातून गाळून घेऊन मिळालेल्या पाण्याने डोळे धुवावे. नीट गाळले गेले नसल्यास त्रिफळ्याचे पाणी थोडा वेळ न हलवता ठेवावे, म्हणजे कण तळाला बसून वरच्या पाण्याने डोळे धुतलेले जास्त बरे. जमत असल्यास रोज संतुलन पादाभ्यंग किटने पादभ्यंग करणे डोळ्यांच्या आरोग्याकरता उत्तम समजले जाते.