
माझ्या बहिणीचे वय ३८ वर्षे आहे. बाळंतपणानंतर तिला कौटुंबिक कारणांमुळे आराम करता आला नाही. तेव्हापासून तिचा रंग काळवंडला आहे, तिचे अंग दुखते, सांधेही दुखतात.
प्रश्नोत्तरे
प्रश्र्न १ - माझ्या बहिणीचे वय ३८ वर्षे आहे. बाळंतपणानंतर तिला कौटुंबिक कारणांमुळे आराम करता आला नाही. तेव्हापासून तिचा रंग काळवंडला आहे, तिचे अंग दुखते, सांधेही दुखतात. हल्ली हल्ली तिच्या अंगावर सूजही येते. कृपया यावर काही उपाय सुचवा...
- मृणाल काळे
उत्तर - बाळंतवाताचा हा एक प्रकार आहे. यावर वातदोष कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वातदोषाला नियंत्रणात आणण्यासाठी बाहेरून तेल आणि आतून तूप वापरणे उत्तम असते. या दृष्टीने अंगाला संतुलन अभ्यंग तिळ सिद्ध तेल, सांध्यांना संतुलन शांती सिद्ध तेल आणि आहारासह कमीत कमी ४-५ चमचे घरी बनविलेले साजूक तूप घेणे उत्तम होय. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ वातबलगोळ्या, रास्नादी गुग्गुळ घेणे, जेवणानंतर संदेश आसव, पुनर्नवासव घेणेसुद्धा चांगले. वातदोष कमी झाला की त्वचेचे काळवंडलेपणही कमी होईल. याला मदत मिळेल ती स्नानाच्या वेळेस साबणाऐवजी आयुर्वेदिक वर्ण्य द्रव्यांपासून तयार केलेले उटणे वापरण्याची. या दृष्टीने सॅन मसाज पावडर आणि मसूर पीठ समभाग एकत्र करून केलेले मिश्रण वापरण्याचा उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली मृदू विरेचन, बस्ती यांसारखे उपचार करून घेणे सर्वांत चांगले.
प्रश्र्न २ : माझ्या मुलाचा मुलगा साडेचार वर्षांचा आहे. त्याची बाकी तब्येत चांगली आहे, पण दात मात्र किडलेले आहेत. दुधाचे दात पडून पक्के दात येताना ते चांगले यावेत यासाठी आत्तापासून काही प्रयत्न करता येतील का?
- सुधीर माने
उत्तर - दातांचे आरोग्य हे दातांच्या शुद्धीवर आणि त्यापेक्षा हाडांच्या ताकदीवर अवलंबून असते. या दृष्टीने त्याला सकाळ-संध्याकाळ १-१ प्रवाळपंचामृत या गोळ्या तसेच दुधातून संतुलन चैतन्य कल्पासह पाव चमचा खारकेची पूड देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी दात घासण्यासाठी संतुलन योगदंती हे दंतमंजन वापरणे आणि दिवसातून २-३ वेळा दात-हिरड्यांना संतुलन सुमुख तेल लावणेसुद्धा उपयोगी पडेल. रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट वगैरे गोड पदार्थ न देणे इष्ट. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लावणेही इष्ट.