शरीरात रक्त कमी आहे; 'या' सहा गोष्टी खाणे ठरेल फायदेशीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

पुणे : आपल्या शरीरात रक्त किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना अॅनिमिया आजार होण्याचीही शक्यता असते. या अॅनिमिया आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं ते लवकर थकतात. यासाठी योग्य आहाराची खूप गरज असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : आपल्या शरीरात रक्त किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना अॅनिमिया आजार होण्याचीही शक्यता असते. या अॅनिमिया आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं ते लवकर थकतात. यासाठी योग्य आहाराची खूप गरज असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रक्त कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी रोजच्या आहारात 'या' सहा गोष्टींचा समावेश केल्यानं तुम्ही सुदृढ आणि सशक्त राहू शकता. 

झोपण्यापूर्वी लवंग नक्की खा; पुरुषांसाठी 'हे' आहेत फायदे 

१) अंडी : रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांचा समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. अंड्यामध्ये एंटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि आयनचं प्रमाण अधिक असतं. एका अंड्यामध्ये साधारण 1 एमजीपर्यंत आयनचं प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील विटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याची मदत होते.

Image result for Egg"

२) पालेभाज्या : पालकाची भाजी किंवा सॅलडमध्ये पालकाचा वापर केल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यातून शरीरात ए, बी-9 आणि ई विटामिन मिळतं. पालेभाज्यांमध्ये आयन आणि विटॅमिन सी असते, त्यामुळे हिरव्या पालेभाज्या खाल्याने शरीर निरोगी राहण्यास फायदे होतात. यासोबत कॅल्शियम आणि फायबरही पालेभाज्यांमधून मिळत असल्याने आपल्या आहारात रोज एकतरी पालेभाजी असायलाच हवी. 

Image result for हिरव्या पालेभाज्या"

३) डाळींब : डाळींब हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते. थंड गुणधर्म असणाऱ्या डाळींबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. डाळींबामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई असतं. डोकेदुखी, उदासिनता, आळस दूर करण्यासाठी डाळींबाचे रोज दाणे खाण्यावेत त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते. 

Image result for डाळिंब"

४) कोबी : कोबी, फ्लावर, कांद्याची पात अशा भाज्यांचा आहारात समावेश असणे केव्हाही फायदेशीर ठरते. कोबीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यानं शरीरातील हाडांना मजबूती देण्याचं काम करतं. कोबी हा कच्चा, सॅलडमध्ये किंवा कोशिंबीर करून खावा. त्यामुळे जास्त लाभ मिळू शकतो. 

Image result for कोबी"

५) बीट : बीटपासून कोशिंबीर, कच्च किंवा उकडलेलं बीट अथवा बीट ज्यूस काहीही तुम्ही घेऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते. चहाऐवजी रोज सकाळी बीटाचा ज्यूस घेतल्यास मोठ्या प्रमाणावर फायदे होऊ शकतात. 

Image result for beet"

६) सोयाबिन : सोयाबिनची भाजी किंवा उकडलेलं सोयाबिनही खाल्लं तरीही आरोग्यासाठी फायदा होतो. सोयाबिनमध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असते. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी भीजवलेलं सोयाबिन खाल्यास फायदा होता. 

Image result for soybean"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 nutrients that increase blood in Human Body