फ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय? मग हे वाचा...

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

फ्रीजमधील या कणिकमुळे आपल्याला आरोग्याला नुकसान होऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या तयार केलेल्या पोळ्यांमुळे आपल्याला पुढीलप्रमाणे नुकसान होऊ शकते. 

मुंबई : आजकल प्रत्येक घराच्या किचनमध्ये आवर्जुन आढळणारी वस्तु म्हणजे फ्रिज. त्यामुळे फ्रिजचा वापर हा सरासर केला जातो. फळ, भाज्या, उरलेलं अन्न हे थेट फ्रिजमध्येच ठेवलं जातं.  आपल्याकडे जास्तीस्त जास्त जण हे संध्याकाळच्या वेळी राहिलेल्या पोळ्यांची कणीक ही फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यापासून पुन्हा सकाळी पोळ्या,पराठे करतात.मात्र रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकमुळे आपल्याला नुकसान होऊ शकते हे आपल्याला माहीत आहे का? फ्रीजमधील या कणिकमुळे आपल्याला आरोग्याला नुकसान होऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या तयार केलेल्या पोळ्यांमुळे आपल्याला पुढीलप्रमाणे नुकसान होऊ शकते. 

Image may contain: 1 person, kitchen and indoor

1. पोटदुखीचा त्रास     
फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,परोठा हे कडक होतात. या कडक पोळ्या खाल्याने पोटदुखीचा त्रास होतो. 
2. पदार्थ अंबविण्याची प्रक्रिया 
फ्रीजमधील पीठापासून तयार केलेल्या पोळ्या,पराठे अंबविण्यास लवकर सुरवात होते. यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टे रीया आणि हानिकारक रसायन तयार होतात.त्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्याला नुकसान पोचते.त्यामुळे यापासून तयार केलेल्या पोळ्या शरीराला त्रासदायक होते. 

Image may contain: food

3. शास्त्रामध्ये शिळ्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या खाऊ नयेत असा उल्लेख करण्यात आला आहे. शास्त्रानुसार शिळे पीठ हे एका पिंडासारखे असून त्यामुळे नकारात्मक शक्ती घरात येतात.त्याशिवाय शिळे भोजन हे भुताचे भोजन असून ते खाण्याने भूताचा प्रभाव वाढतो.ज्या परिवारात शिळे अन्न खाल्ले जाते त्या घरात कोणीना कोणी सतत आजारी असते.त्यामुळे चुकूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाच्या पोळ्या तयार करु नयेत.
त्यामुळे यापुढे पिठ फ्रिजमध्ये ठेवण्याआधी एकदा विचार करा. किंबहुना ते करणे आजच थांबवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flour kept in the fridge can be dangerous to your health