
रेफ्रिजरेटरचे व्यवस्थापन ही सगळ्यांसाठीच खूप जिकिरीची बाब असते. अनेक पदार्थ आणि वस्तू त्यात ठेवायच्या असतात; पण ती जागा संपून जाते, अशी चिंता असते.
किचन गॅजेट्स : अंडर-शेल्फ फ्रिज ऑर्गनायझर
रेफ्रिजरेटरचे व्यवस्थापन ही सगळ्यांसाठीच खूप जिकिरीची बाब असते. अनेक पदार्थ आणि वस्तू त्यात ठेवायच्या असतात; पण ती जागा संपून जाते, अशी चिंता असते. त्यासाठी अनेक नवीन रेफ्रिजरेटरमध्येच सोयी असल्या, तरीही स्टोरेजसाठी गरज भासतेच. विशेषतः अगदी छोट्या छोट्या लिंबासारख्या गोष्टींचे काय करायचे असा प्रश्न असतो. त्यासाठीच अंडर-शेल्फ फ्रिज ऑर्गनायझर नावाचे साधन बाजारात आले आहे. हे छोटे छोटे ट्रे असतात. बहुतेक वेळा ते प्लास्टिकचे असतात; पण इतरही मटेरिअलचे ट्रे बाजारात उपलब्ध आहेत. या ट्रेंमध्ये पाहिजे ते पदार्थ किंवा वस्तू ठेवून ते त्या त्या शेल्फला अडकवून ठेवले की झालं. फ्रिजमधील कप्पे उंच असतात. त्यामुळे उभी जागा नीट वापरली जात नाही. याच गोष्टीवर हे ट्रे उपयोगी पडतात. त्यात पाहिजे त्या गोष्टी ठेवणं अतिशय सोपं आणि हे ट्रे काढणं किंवा पुन्हा अडकवणं हेही सोपं असतं. गरजेनुसार पाहिजे तितके ट्रे तुम्ही खरेदी करून फ्रीजमध्ये वापरू शकता.
फ्रिज ऑर्गनायझरची वैशिष्ट्ये...
फ्रिजमधील स्टोरेजची क्षमता वाढण्यासाठी उपयुक्त.
चिरलेली लिंबे, कोथिंबिरीपासून अगदी छोट्या मसाल्याच्या डब्या वगैरे ठेवता येतात.
ट्रे लावले, तरी इतर सगळ्या गोष्टी काढणं किंवा ठेवणं यात काही फरक पडत नाही.
स्वच्छ करणे अगदी सोपे.
फ्रिजमधील कप्पे हे उच्च दर्जाच्या काचेपासून बनवलेले असतात. त्यामुळे ट्रे लावले तरी त्यांच्या वजनाचा काही फरक पडत नाही.