आहार‘मूल्य’ : आहार आणि इन्फ्लेमेटरी रोग

ऑटोइम्युन डिसॉर्डर, ॲलर्जी, दमा इत्यादींमध्ये आपल्या शरीरावर सुज दिसून येते.
Diet
DietSakal

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

ऑटोइम्युन डिसॉर्डर, ॲलर्जी, दमा इत्यादींमध्ये आपल्या शरीरावर सुज दिसून येते.

याची मुख्य लक्षणे

  • वेदना

  • लालसरपणा

  • सुज

  • सांध्याची हालचाल त्रासदायक होणे

  • थकवा

  • तोंड कोरडे पडणे

ही सर्व लक्षणे आणि सुज हा प्रतिसाद आहे अनियोजित इन्फ्लेमेटरी रोगाचा.

या रोगासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात - दुखापत, तणाव, अनियमित जीवनशैली व आहार, इतर ॲलर्जन्सशी संपर्क.

आज आपण आहाराविषयी जाणून घेऊ.

इन्फ्लेमेशन निर्माण करणारे पदार्थ

  • रिफाईन्ड कर्बोदके जी मैद्यापासून बनलेली असतात.

  • तळलेले मीठयुक्त पदार्थ. उदा. चिप्स

  • सोडायुक्त व साखरयुक्त पेये

  • रेड मीट (मटण)

खालील सवयीसुद्धा सुज निर्माण करतात

  • ताण - तणाव

  • व्यायामाचा अभाव

  • अपुरी झोप

  • अल्कोहोल व धूम्रपान.

वरील गोष्टी टाळल्यास सुज निर्माण होण्यास प्रतिबंध होईल.

इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी आहारातील व जीवनशैलीतील बदल

  • आहारामध्ये रंगयुक्त फळांचा व भाज्यांचा वापर करावा. त्यातील फायटोन्युट्रियंट्समुळे सुज कमी होण्यास मदत होते. उदा- टोमॅटो, स्ट्रॉबेरी, संत्री इ.

  • आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे.

  • आहारामध्ये नट्स बदाम, अक्रोड इत्यादींचा समावेश करावा. त्यातील इसेन्शिअल फॅट्समुळे अंगावरची सुज कमी होण्यास मदत होते.

  • आहारामध्ये विविध सीड्स उदा. भोपळ्याच्या बिया, जवस, चिया सीडस यांचा वापर करावा. त्यातील ओमेगा थ्री मुळे सुज कमी होण्यास मदत होते.

  • पाणी योग्य प्रमाणात प्यावे. डिहायड्रेशन टाळावे.

  • योग्य पद्धतीचा व्यायाम आठवड्यातून किमान चार ते पाच वेळेस किमान दोन तास करावा.

  • रात्रीची जागरणे तळावीत.

  • ध्यान व मेडिटेशनमुळे तणाव कमी होण्यास मदत होऊन इन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत होते.

  • श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम.

  • किमान सात-आठ तासांची झोप आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com