Bhagwat Ekadashi : महाशिवरात्रीच्या एकादशीची थाळी कशी असावी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Ekadashi

Bhagwat Ekadashi : महाशिवरात्रीच्या एकादशीची थाळी कशी असावी?

इतरवेळचे उपवास कोणी केले नाहीत तरी वर्षातून येणाऱ्या दोन एकादशी करायला घरातले सगळेच उत्साही असतात. एक म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे महाशिवरात्रीला येणारी भागवत एकादशी होय. उद्या भागवत एकादशी आहे.

भागवत एकादशीला केवळ फराळावर ताव मारायचा म्हणून उपवास करणारे अनेक लोक आहेत. पण, नेहमीच उपवास करणाऱ्या लोकांसाठी हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे भगर सोडून वेगळं काहीतरी पदार्थ नक्की ट्राय करायला हवेत.

या दिवशी आपल्या थाळीत आरोग्यदायी पदार्थ असणे अधिक गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या अपचनाचा त्रास होणार नाही व आपण उपवास देखील करु शकतो. उपवासाच्या दिवशी आपल्या खाण्यापिण्यात अधिक बदल घडलेले दिसतात.

आपल्या ताटात साबूदाण्याची खिचडी किंवा वडा, भगर, दूध किंवा खीर, राजगिरा असे अनेक उपवासाचे पदार्थ आपण खातो. आपल्या कुटुंबातील एकाचा उपवास असला की, संपूर्ण कुटुंबाची खाण्याच्या बाबतीत मज्जा असते.

साबुदाणा खिचडी किंवा वडा

साबुदाणा भिजवून त्यापासून अनेक पदार्थ केले जातात. त्यापैकी वडा आणि खिचडी हेच पदार्थ नेहमी बनवले जातात. साबुदाणा पचायला हलका असल्याने त्याचा तुमच्या ताटात समावेश करा.

वरीच्या तांदळाचे, डोसे चटणी

वरी भिजवून त्यापासून बनलेले डोसे आणि खोबऱ्याची फोडणी दिलेली चटणी तूमची भूक भागवायला नक्की मदत करेल.  वरी आणि साबुदाण्याच्या पिठाची भाकरी आणि बटाट्याची भाजीही तूम्हाला फ्रेश ठेवेल.

खीर

उपवासाला चालेल अशी साबुदाण्याची गोड खीर ताटाला वेगळीच शोभा देईल. या दिवशी केवळ ड्रायफ्रूट्स आणि गोड दुधात केलेली खीर स्वीटची कमी भरून काढेल.

सॅलेड

उपवासाला काकडी खाल्ली तर चालते. त्यामुळे काकडी आणि दह्यातील रायते किंवा सॅलेडचा तूमच्या ताटात समावेश करा. ज्यामुळे दिवसभर तूमचे पोट भरलेले राहील.

फळांचे काप

दुपारच्या फराळानंतर थोड्यावेळाने पुन्हा भूक लागली तर तूम्ही फळे खाऊ शकता. या दिवसात कलिंगड, डाळींब अशी ताजी फळे मिळतात. जी तूमच्या शरीराला हायड्रेड ठेवायला मदत करते.