धक्कादायक! ढोकळा खाल्याने नववधूचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

धक्कादायक! ढोकळा खाल्याने नववधूचा दुर्दैवी मृत्यू

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खुप महत्त्वाचा क्षण असतो. प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र एका मुलीली तीचं लग्न जीवावर बेतलं. हा आनंदाचा क्षण एका मुलीसाठी मृत्यूचं सावट ठरला. स्वत:च्याच लग्न सोहळ्यात नवरीने ढोकळा खाल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सध्या हे प्रकरण खुप चर्चेत आलंय कारण ढोकळा खाल्याने मृत्यू कसा झाला, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. पण हे खरंय. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. (Bride Shocking death by eating dhokla in marriage madhya pradesh)

हेही वाचा: Viral Video: 'हात लावायचा नाय, चावलंच तुला! थेट अधिकाऱ्यालाच धमकी

छिंदवाडा येथील एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमात नवरीने ढोकला खाल्ला मात्र हा ढोकळा तिच्या घशात अडकला. तिला खोकला यायला लागला मात्र बराच वेळ झाला तरी तिचा खोकला थांबेना आणि तिची प्रकृती आणखी खालावली म्हणून तिला दवाखान्यात नेण्यात आले मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अगदी धक्कादायक असा तिचा मृत्यू होता.

हेही वाचा: Viral Video: 'हात लावायचा नाय, चावलंच तुला! थेट अधिकाऱ्यालाच धमकी

मेघा काळे असे या मृतक तरुणीचं नाव असून मुंबईत तिने MBBS चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती तिथेच प्रॅक्टीस करत होती. लग्नासाठी ती गावी आली होती. पुण्यातील राहणाऱ्या एका इंजिनिअर सोबत तिचं लग्न जुळलं होतं मात्र मेघाच्या असं अचानक आणि धक्कादायक मृत्यूने नवरदेवाकडील लोकांनाही चांगलाच धक्का बसला.