esakal | स्नॅकमध्ये बनवा चिली चिज पॉपर्स रेसीपी

बोलून बातमी शोधा

Chili Cheese Poppers Recipe made by home tips food marathi news}

नाश्ता बरोबर अथवा जेवणापूर्वी स्नॅक खाण्याची पद्धत अलीकडे  वाढली आहे

स्नॅकमध्ये बनवा चिली चिज पॉपर्स रेसीपी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: नाश्ता बरोबर अथवा जेवणापूर्वी स्नॅक खाण्याची पद्धत अलीकडे  वाढली आहे. कुटुंबातील सदस्यांना तुम्हाला जर नावीन्यपूर्ण स्नॅक द्यायचे असेल तर या ठिकाणी रेसिपी  सांगणार आहोत. हा पदार्थ नक्कीच तुमच्या घरातील सदस्यांच्या आवडीचा पदार्थ ठरेल.

लागणारे साहित्य 
 
पाव कप चांगल्या पद्धतीने बारीक केलेले चीज 
* पाव कप बारीक केलेले पनीर
 * दोन ते तीन हिरव्या मिरच्या
* एक चमचा कापलेले कोथंबीर
 * पाव चमचा रेड बेल पेपर बारीक कापलेले 
*पाव चमचा यलो पेपर बारीक केलेले 
* पाव चमचा सिमला मिरची बारीक केलेले 
* जरुरीनुसार मीट 
* काळी मिरची 
* सहा ते आठ भावनगरी मिरची.

कृती 

1)ओव्हन 180 डिग्री सेल्सियस ला गरम होण्यासाठी सेट करा. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर ठेवा 

2)पनीर आणि चीज ला एका बाउल मध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करा 

3)त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथंबीर, बेल पेपर्स शिमला मिरची,  मीठ आणि काळी मिरची घाला. सर्व साहित्य चांगल्या पद्धतीने एकत्रित एकजीव होतील अशा पद्धतीने मिक्स करा 

4)भावनगरी मिरचीला मधोमध चिरून घ्या आणि तयार झालेले सर्व मिश्रण त्यामध्ये भरा

5)  भरलेली मिरची बेकिंग ट्रे मध्ये ठेवा त्यावरील चीज फुलून येऊ पर्यंत बेक करा.
 आता तुमचे मनपसंत स्वास बरोबर गरमागरम चिली चीज पॉपर्स खाण्यासाठी देऊ शकता.