नारळ आणि भाजलेल्या चण्याची टेस्टी चटणी! एकदा ट्राय कराच...

Sakal - 2021-03-03T161812.387.jpg
Sakal - 2021-03-03T161812.387.jpg

नाशिक : नारळ चटणी ही दक्षिण भारतातील एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. हे सहसा इडली आणि डोसा सोबत खाल्ले जाते. यासाठी ओल्या किंवा सुक्या नारळाचा वापर करून विविध पध्दतीने आपल्याला नारळ चटणी बनवता येऊ शकते, जे काही मिनिटांत तयार करता येते. आपण आज जी रेसिपी सांगणार आहोत ती चटणी इडली सांबर, डोसा, ,अप्पम आणि कोणत्या ही प्रकारचे पराठ्या सोबत चांगलीच वाटते आणि बनवायलाही सोपी आहे

नारळ आणि भाजलेल्या चण्याची चटणी
साहित्य
50 ग्रॅम नारळ
25 ग्रॅम भाजलेले चणे (हरभरे)
2 चमचा उडीद डाळ
5 हिरव्या मिरच्या
5 संपूर्ण लाल मिरच्या
2 चमचे तेल
1 चमचे जिरे
1चमचे राई
पाव चमचे  हिंग पावडर
6 कडीपत्त्याची पाने
1 चमचे धणे 
1 चमचे  लाल तिखट
1 कांदा
मीठ, चवीनुसार


बनविण्याची पद्धत

-भाजलेले चण्याची साले काढून घ्या. कांदा आणि मिरची धूवून स्वच्छ करून घ्या.
-भाजलेले चणे, नारळ, कांदा, हिरवी मिरची, जिरे, धणे, लाल तिखट आणि मीठ एकत्र करून बारीक वाटून घ्या.
-तेल गरम करा. मोहरीचे दाणे घाला. त्यात उडीद डाळ घाला. ते हलके तपकिरी होईपर्यंत फ्राय करा.
-यात हिंग पावडर आणि लाल तिखट घाला. कडीपत्त्याची फोडणी द्या. 
- ही फोडणी चटणीत मिसळा.
-नारळ आणि भाजलेल्या चण्याची चटणी तयार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com