Cucumber Lassi : उन्हाळ्यात बॉडी हायड्रेट ठेवण्याचा टेस्टी ऑप्शन l Cucumber Lassi Summer Recipe body hydrate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cucumber Lassi

Cucumber Lassi : उन्हाळ्यात बॉडी हायड्रेट ठेवण्याचा टेस्टी ऑप्शन

Cucumber Lassi Summer Recipe : होळी नंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. अशात स्वतःला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आणि गारवा वाटावा म्हणून वेगवेगळे प्रकार केले जातात. पण कडक उन्हाळा सुरू होण्यापासूनच शरीराची काळजी घेत हायड्रेट ठेवत गेलात तर उन्हाळ्याचा त्रास जाणवणार नाही. सध्या काकडीचा सिझन सुरू होत आहे. त्यामुळे काकडी लस्सी हे तुम्हाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठीचे उत्तम पर्याय ठरू शकते. जाणून घ्या बनवण्याची पद्धती.

साहित्य

 • १ कप दही

 • १ मोठा चमचा बारीक चिरलेले आले

 • काकडी

 • अर्धा कप बर्फाचे तुकडे

 • काळं मीठ चवीनुसार

 • कोथिंबीर

 • काळी मीरे पूड गरजेनुसार

कृती

काकडी, कोथिंबीर, आले स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यावे.

त्यात बर्फाचे तुकडे आणि दही घालून फिरवून घ्यावे.

त्याला मिक्सरमध्ये फिरवल्यावर फेस येतो.

हे सर्व नीट मिक्स झालं की, त्यात चवीनुसार काळ मीठ, मीर पूड टाकावी.

छान सर्व करावं.

या काकडी लस्सीचे फायदे

 • दह्यात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती मजबूत होते.

 • काकडी आणि दही दोन्हीची प्रवृत्ती थंड असल्याने उष्णतेपासून संरक्षण होते.

 • नियमीत सेवन केल्याने बॉडी हायड्रेट राहते.

 • ही लस्सी प्यायल्याने लवकर भूक लागत नाही.

 • यामुळे वेटलॉस साठी मदत होते.