esakal | उन्हाळ्यात 'हे' पदार्थ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवणे ठरू शकते धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

freez.

उन्हाळ्यात काही पदार्थ जास्त प्रमाणात फ्रिजींग केल्यास त्याचे दुष्परिणाम होतात

उन्हाळ्यात 'हे' पदार्थ जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवणे ठरू शकते धोकादायक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

उन्हाळ्यात काही पदार्थ जास्त प्रमाणात फ्रिजींग केल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे उन्हाळ्यात असे काही पदार्थ आहेत जे जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवू नये. या काळात बरेच जण ब्रेड, पनीर, अंडी आणि पालेभाज्या खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवतात. तसेच शिजवलेले अन्नही फ्रिजमध्ये ठेवले जातात. पण उन्हाळ्यामध्ये काही पदार्थ फ्रिजमध्ये धोकादायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणते पदार्थ फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवू नये.

ब्रेड-
या यादीत पहिले नाव येते ते ब्रेडचे. बरेच जण एक-दोन वापरलेले पॅकेट एकत्र करून ते एक ते दोन आठवड्यांपर्यंत फ्रीझमध्ये ठेवतात. ब्रेड कमीतकमी दोन ते तीन दिवस फ्रिजमध्ये व्यवस्थित राहू शकतो. कारण एकदाचे पॅकेट उघडल्यानंतर पुन्हा हवेची कडक पॅक करणे कठीण होते आणि खराब होण्याची उच्च शक्यता असते.

दुधी भोपळ्यापासून काही मिनिटांत बनवा कटलेट; सोपी रेसिपी अशी   

अंडी-
अंडी जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास धोकादायक ठरू शकतात. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक द्रव्ये लवकर संपतात. त्यामुळे कच्च्या अंड्यांसोबत अंड्यांची भाजीही फ्रिजमध्ये ठेवल्यास धोकादायक ठरू शकते.

पनीर-
तसे पाहिले तर पनीरला सहजरित्या फ्रिजमध्येच स्टोअर करावे लागते. पण पनीर फ्रिजमध्ये स्टोअर करण्याचीही एक पद्धत आहे. जर तुम्ही मोकळ्या ताटात किंवा प्लेटमध्ये काही दिवस पनीर फ्रिजमध्ये ठेवलं तर ते लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे ज्यावेळेस पनीर फ्रिजमध्ये ठेवाल त्यावेळी ते व्यवस्थित एअर टायट पॅक डब्ब्यात ठेवलं पाहिजे.

फक्त 20 मिनिटांत बनवा स्प्राऊट पोहे; अशी आहे रेसिपी 

चिकन, मटन-
बरेच दुकानदार चिकन किंवा मटण स्टोअर करत असतात. त्यामुळे ते पुन्हा अजून फ्रिज केल्याने धोकादायक ठरू शकते. शिजवलेले चिकन आणि मटनही जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवणे योग्य नाही.

loading image