थंडीत गूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

टीम ई-सकाळ
Thursday, 3 December 2020

थंडीत गूळ खाल्याने शरीराला आराम मिळतो. गुळामधील तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पुणे महाराष्ट्र: थंडीमध्ये गूळ खाणे शरीरासाठी अंत्यत फायदेशीर मानले जाते. रिकाम्या पोटी गूळ खाणे फायदेशीर असते हे तर तुम्हाला माहीत असेल, पण गुळाचे पाणी पिणे हे देखील फायेदशीर असते, हे तुम्हाला माहित आहे का? गुळामध्ये नैसर्गिक शर्करा असते असे मानले जाते. 

थंडीच्या दिवसांमध्ये रात्री झोपण्यापुर्वी गूळ खाणे पोटाच्या त्रासांपासून दूर ठेवते. डाएट फूडमध्ये गुळाचा समावेश असतो. थंडीत गूळ खाल्याने शरीराला आराम मिळतो. गुळामधील तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असते.

अ‍ॅसिडिटी होतेय ? मग आवळा खा! जाणून घ्या आणखी फायदे​

गूळ खाण्याचे ४ फायदे
सर्दी-पडसे :

थंडीमध्ये गूळ खाल्ल्यामुळे सर्दी-पडसे सारखे आजार दूर राहतात. गूळ हा उष्ण असतो जो शरीरात ऊर्जा निर्माण करतो आणि सर्दी-पडसे दूर ठेवतो. काळी मिरी आणि आल्यासोबत गूळ खाल्यास सर्दी पडसे होणार नाही.

हाडांची मजबुती :
गूळ खाणे हाडांच्या मजबुतीसाठी चांगले आहे. गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे भरपूर प्रमाण असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

थंडीत खा मनुके! जाणून घ्या फायदे अनेक​

रक्त दाब 
रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी गूळ खाणे फायदेशीर आहे. रक्त दाब नियंत्रित ठेवण्यास फायदा होतो.

रक्ताची कमतरता
गुळामध्ये आयर्न (लोह) चे खूप प्रमाण आहे. शरीरातील लोहच्या कमतरतेमुळे अॅनिमियाचा त्रास होतो. गूळ खाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

- फूडसंबंधी इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know the benefits of eating jaggery in Winter