Doda Barfi: पंजाबी कुस्तीपटूने तयार केलेल्या दोडा बर्फीचा 110 वर्षाचा इतिहास काय सांगतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Doda Barfi

Doda Barfi: पंजाबी कुस्तीपटूने तयार केलेल्या दोडा बर्फीचा 110 वर्षाचा इतिहास काय सांगतो?

डोडा बर्फीचा इतिहास: भारतीय मिठाईला तिचा एक वेगळा स्वाद आहे. भारतीयांनी तयार केलेल्या बर्फीची फक्त चवच नाही तर बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. काही मिठाई या तळल्यानंतर साखरेच्या पाकात बुडवल्या जातात, तर काही मिठाई या तासभर कढईमध्ये शिजवल्या जातात. एवढ्या मेहनतीनंतर तयार झालेली मिठाई तयार खाल्ल्यानंतर लोक मिठाई तयार करण्याऱ्याचे भरपूर कौतुक करतात.

भारतात वेगवेगळ्या मिठाईचे प्रकार तयार होतात त्यातील बर्‍याच लोकांची आवडती मिठाई म्हणजे डोडा बर्फी. या बर्फीचे वैशिष्ट्य म्हणजे ती बनवताना खवा म्हणजेच मावा वापरला जात नाही. सणासुदीच्या काळात आणि हरियाणा-पंजाबमध्ये कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी ही मिठाई मोठ्या प्रमाणात ऑर्डर केली जाते. या सगळ्याच्या दिलपसंद मिठाईचा इतिहासही तितकाच सुंदर आहे.

चला जाणून घेऊया जगाला ही स्वादिष्ट मिठाई ज्या व्यक्तीने तयार करुन दिली त्याविषयी माहिती..

या बर्फीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर

त्या काळाच्या थोडे मागे जावे लागेल, जेव्हा भारताला 'हिंदुस्थान' म्हटले जायचे आणि त्याचे दोन तुकडे झाले नव्हते. 1912 मध्ये अविभाजित भारतात पंजाब मध्ये हंसराज विग नावाचा एक कुस्तीपटू होता. या पैलवानाला ताकदीसाठी तूप आणि दूध मोठ्या प्रमाणात खावे लागले, कालांतराने तो रोज हे खाऊन कंटाळला होता.

त्यामुळे त्याने तूप आणि दुधाला पर्यायी पदार्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करू लागला. एकदा त्यांनी चुल्हीवर एक तवा ठेवला आणि त्यात दूध, तूप, मलई, साखर आणि ड्रायफ्रुट्स टाकून ते दुध घट्ट करायला सुरुवात केली. यानंतर तयार झालेल्या मिश्रणांची डोडा बर्फी तयार झाली.नंतर ही मिठाई साऱ्या जगाला माहीत झाली. हरबनला त्याने तयार केलेल्या मिठाईची चव खूप आवडली आणि तो वेळोवेळी ही मिठाई बनवून खायला लागला. कारण ही मिठाई आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू लागली होती.पुढे काही दिवसांत हरबनने या मिठाईची विक्री देखील सुरू केली.

काही वेळातच ही मिठाई देशभरातील अनेक लोकांची आवडती मिठाई बनली. ही मिठाई घरी सहज बनवता येते आणि फ्रीजमध्ये दोन आठवडे टिकूनही राहते. ही डोडा बर्फी चवीला उत्तम असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उत्तर भारतात ही मिठाई मोठ्या आवडीने खाल्ली जाते.

या मिठाईचा जाणे शोध लावला होता त्या पैलवानांचे काय झाले?

फाळणीनंतर ते भारतात आले. आणि त्यांचे कुटुंब सरघोडा जिल्ह्यातून (आताचे पाकिस्तान) पंजाबमधील कोटकपुरा येथे गेले. येथूनच त्यांनी रॉयल डोडा हाऊस सुरू केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यही पाकिस्तानात गेला आणि तो तिथे या मिठाईचा वारसा सांभाळत आहे.रॉयल डोडा हाऊस आता त्यांचा नातू विपिन विग सांभाळत आहे. इथे मिळणाऱ्या दोडा बर्फीची चव आजही तशीच आहे, जी शंभर वर्षांपूर्वी होती. हे पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे आणि तिथल्या प्रत्येक शहरात ते पोहोचवले जाते. त्यांनी या मिठाईची विदेशातही निर्यात सुरू केली आहे. जर तुम्ही अजून या मिठाईची चव घेतली नसेल तर जेव्हा केव्हा उत्तर भारतात जालं तेव्हा नक्की खाऊन पहा.