मनाची शक्ती : सात्त्विक आहार...

सात्त्विक आहार तुम्हाला तुमचा स्वतःचा डॉक्टर बनण्यास मदत करतो. फक्त तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये बदल करून, आरोग्यदायी जीवन जगू शकता आणि आजारांना दूर ठेवणे शक्य होईलच.
Diet
DietSakal
Summary

सात्त्विक आहार तुम्हाला तुमचा स्वतःचा डॉक्टर बनण्यास मदत करतो. फक्त तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये बदल करून, आरोग्यदायी जीवन जगू शकता आणि आजारांना दूर ठेवणे शक्य होईलच.

- डॉ. हंसा योगेंद्र

सात्त्विक आहार तुम्हाला तुमचा स्वतःचा डॉक्टर बनण्यास मदत करतो. फक्त तुमच्या आहाराच्या सवयींमध्ये बदल करून, आरोग्यदायी जीवन जगू शकता आणि आजारांना दूर ठेवणे शक्य होईलच. निरोगी, पौष्टिक खाणे अत्यंत सोपे आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या गोष्टींचा वापर करून आपण चविष्ट पदार्थ तयार करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे सात्त्विक आहार हा पूर्णपणे शाकाहारी आहार आहे. त्यामध्ये हंगामी ताजी फळे, भरपूर ताज्या भाज्या, धान्य, कडधान्ये, सुका मेवा, बिया, मध, ताजी वनस्पती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो. हे पदार्थ सत्त्व किंवा आपल्या चेतनेची पातळी वाढवितात.

आपण आज काही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपींची माहिती घेऊयात..

१. खजूर आणि बदाम, नारळाचे लाडू

साहित्य -

खजूर - १ वाटी

बदाम - २ चमचे

पिस्ता - २ चमचे

काजू - ३ चमचे (या सर्व साहित्याचे

बारीक-बारीक तुकडे केलेले असावेत)

साजूक तूप - १ चमचे.

खोवलेला नारळ अर्धी वाटी

कृती - एका कढईत तूप गरम करा, त्यात खजूर घाला आणि सतत ढवळत असताना मंद आचेवर काही मिनिटे शिजवा. गॅस बंद करून त्यात बदाम, पिस्ता आणि काजू घालून चांगले मिक्स करा. थंड झाल्यावर त्याचे गोल गोळे करून घ्या. एक गोळा घ्या आणि खोवलेल्या नारळात फिरवा. ताबडतोब खायला द्या. हे लाडू हवाबंद डब्यात ठेवा.

२. भाजलेला मखाना

साहित्य -

मखाना - ३ वाटी

हळद - पाव चमचा

तेल - २ ते ३ चमचे

आवश्यकतेनुसार मीठ, चाट मसाला

कृती - कढईत तेल गरम करा. मखाना घाला आणि मंद आचेवर १० मिनिटे ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. चाट मसाला सोडून हळद आणि मीठ घाला. गॅस बंद करा. संपूर्ण मिश्रण नीट ढवळून घ्यावे. सर्वांत शेवटी चाट मसाला वरून भुरभुरावा. चांगल्या पद्धतीने एकत्र करून घेणे. ताबडतोब खायला देऊ शकता. उरलेला मखाणा हवाबंद डब्यात ठेवावा.

३. भाजलेल्या मिश्र बिया

साहित्य -

सूर्यफूल बिया - पाव वाटी

भोपळ्याच्या बिया - पाव वाटी

फ्लॅक्स बिया - अर्धी वाटी

पांढरे तीळ - अर्धा चमचा

काळे तीळ - अर्धा चमचा

कृती - एका कढईत भोपळ्याच्या बिया घाला. मंद आचेवर बिया भाजून घ्या. अधूनमधून ढवळत राहा. बिया फुटायला लागल्यावर बिया बाजूला ठेवा. उर्वरित बियांसह हीच कृती करा. सर्व बिया भाजून झाल्यावर एकत्र करा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com