esakal | साऊथ इंडियन आणि गुजराती खाणे पसंद करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

easy recipe of dhokla idli together snack in kolhapur

त्यामुळे इडली ढोकळा ही एक नवी रेसिपी तयार होते. एक परफेक्ट स्नॅक म्हणून हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता.

साऊथ इंडियन आणि गुजराती खाणे पसंद करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : साउथ इंडियन इडली आणि गुजराती ढोकला हे वेगवेगळे पदार्थ आहेत. परंतु संपूर्ण देशात यांना नाश्त्याच्या रुपात पसंत केले जाते. दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातून असूनही या दोघांना एकत्र खाण्याची प्रक्रिया सेमच आहे. हे पदार्थ बनवतानाही जवळजवळ एकसारखी प्रक्रिया केली जाते. त्यामुळे इडली ढोकळा ही एक नवी रेसिपी तयार होते. एक परफेक्ट स्नॅक म्हणून हा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता.

बनवण्याची पद्धत - 

एका बाउलमध्ये अर्धा कप बेसन, दोन ते तीन चमचे सुजी, हळद पावडर, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, आलं, हिरवी मिरची, थोडंसं तेल, दही हे मिश्रण एकत्र करुन घ्या. त्यानंतर यामध्ये हळूवार पाणी घाला आणि मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणाला दहा मिनिटं तसेच ठेवा. नंतर यामध्ये मीठ, बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घाला. नंतर याला इडलीच्या साच्यात टाका. आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत शिजू द्या. यानंतर ढोकळ्याला तडका द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, पांढरे तीळ, कडिपत्ता, कोथिंबीर, थोडे पाणी आणि थोडीशी साखर, लिंबूचा रस घाला. दोन ते तीन मिनिटे पाणी उकळू द्या. इडली ढोकळा या दोन्हींवर हे मिश्रण सर्व्ह करा.