मुलेही आवडीने खातील कारल्याची भाजी; या रेसिपी करा ट्राय

अशाच काही रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
मुलेही आवडीने खातील कारल्याची भाजी; या रेसिपी करा ट्राय

कोल्हापूर : कारल्याचं नाव ऐकल्यानंतर साधारणतः मुलं ते खाण्यास मनाई करतात. याचा स्वाद कडू असल्याने कारल्याच्या भाजीला पसंती कमी आहे. परंतु यामध्ये उपलब्ध असलेले पोषक तत्वे शरीरासाठी फायद्याची असतात. यासाठी काही विशेषतज्ञ नेहमी आहारामध्ये (diet) कारल्याचा समावेश असावा असा सल्ला देतात. परंतु या कारल्याच्या काही गोड रेसिपी आहेत. ज्यामुळे कारले खाल्ले जाते. अशाच काही रेसिपी (receipe) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या तुमच्या डिनर किंवा लंचसाठी वापरू शकता.

दही कारले (dahi karale)

सुरुवातीला कारणे स्वच्छ धुऊन घ्या. त्याला मधून कट करा. यातील बिया काढून त्या वेगळ्या करा. आता या बिया एका बाऊलमध्ये टाकून त्यामध्ये पाणी घाला. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला आणि दहा मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घाला आणि दोन चमचे मीठ घालून पंधरा मिनिटांसाठी ते तसेच शिजू द्या. पेस्ट बनवण्यासाठी कारले मधून कापा त्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आल्याचे छोटे तुकडे करून घ्या आणि अर्ध्या कप पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून बारीक करुन घ्या. मिठाच्या पाण्यातून कारले बाहेर काढा आणि नॉर्मल पाण्याने स्वच्छ करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये कारलं तळण्यासाठी टाका. जोपर्यंत याचा ब्राऊन कलर येत नाही तोवर याला फ्राय करा. त्यानंतर सर्व कारली एका प्लेटमध्ये काढून त्यामध्ये दोन चमचे तेल घाला. सोबत जिरे आणि हिंग पावडर टाका. त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घाला. दोन मिनिटांसाठी तो कांदा भाजा. त्यानंतर या मिश्रणामध्ये तयार पेस्ट घाला आणि पाच मिनिटांसाठी ही पेस्ट शिजू द्या. त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर, कस्तुरी मेथी, साखर, मीठ घाला. दोन-तीन मिनिटांसाठी हे मिश्रण शिजू द्या. नंतर यामध्ये चार ते पाच चमचे दही घाला आणि मंद आचेवर ते मिश्रण शिजवून घ्या. एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये कारल्याचे तुकडे घाला आणि दोन-तीन मिनिटांसाठी हलवून त्यामध्ये पाणी घाला. पुन्हा पंधरा ते वीस मिनिटानंतर हे मिश्रण शिजू द्या. तुमचे दही कारले तयार आहेत.

कांदा आणि कारल्याची भजी

सुरुवातीला कारल्याला स्वच्छ धुऊन, कट करुन त्यावर हळद आणि मीठ मिक्स करून रात्रभर ते तसेच ठेवा. कांदा आणि कारल्याची भजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्या. त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची कट करुन घाला. एक मिनिटानंतर यामध्ये चिरलेला कांदा मिक्स करा. तो भाजू द्या. या दोघांना साधारणतः चार ते पाच मिनिटांसाठी भाजून घ्या. नंतर यामध्ये मसाले, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घाला. हे सर्व मिश्रण एकत्र करा. मसाला कारल्यामध्ये मिक्स केल्यानंतर एक प्लेट झाका. किमान सात ते आठ मिनिटांसाठी हे शिजू द्या. परंतु हे शिजत असताना ते मिश्रण चेक करत रहा, जेणेकरून कारले खालून करपणार नाही याची काळजा घ्या. अशाप्रकारे कांदा कारल्याची स्वादिष्ट भाजी तयार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com