esakal | काहीच मिनिटांत दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट पुलाव; सोपी रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

काहीच मिनिटांत दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट पुलाव; सोपी रेसिपी

काहीच मिनिटांत दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट पुलाव; सोपी रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दुधी भोपळा ही एक अशी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम फायदेमंद भाजी आहे. गरमीच्या दिवसात ही बाजारात अधिक प्रमाणात उपलब्ध असते. याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. साधारणतः आजार दूर ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच शरीराचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठीही दुधीभोपळ्याचा वापर होतो. दुधीभोपळ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु यांपासून बनवलेला पुलाव अत्यंत स्वादिष्ट असतो. मुलही याला पसंती दर्शवतात. शिवाय तो त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. राजाचं आज आपण ही रेसिपी जाणून घेणे

साहित्य -

 • तांदुळ - 4 कप

 • दुधीभोपळा तुकडे - 4 कप

 • मीठ चवीनुसार

 • लाल मिरची पाउडर-2 चमचे

 • हळद पाउडर -1 चमचा

 • जीरे पाउडर -1 चमचा

 • धने पाउडर -1 चमचा

 • गरम मसाला - 1 चमचा

 • दही - 1 कप

 • आलं लसुन पेस्ट - 2 चमचे

 • चिरलेले कांदे -2

 • चिरलेला बारीक टोमॅटो - 3

 • चिरलेली कोथिंबीर - 1 कप

 • तेल - आवश्यकतानुसार

 • तुप - 1 मोठा चमचा

 • कडीपत्ता - 2

 • दालचीनी छोटी - 2

 • चिरलेली हिरवी मिरची - 2-3

कृती -

कुकरला गॅसवर ठेवा. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, दालचिनी आणि जिरे घाला.

यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर आलं आणि लसूण पेस्ट घाला.

यात चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली हिरवी मिरची घालून दुधी भोपळ्याचे छोटे-छोटे तुकडे करून यात मिक्स करा.

या मिश्रणाला शिजू द्या नंतर त्यात दही, लाल तिखट, हळद, जीरा पावडर हे पदार्थ मिक्स करा.

हे मिश्रण एकत्र केल्यानंतर यामध्ये तांदूळ घाला. कुकरचे झाकण बंद करून एक शिट्टी होऊ द्या. यानंतर गॅस बारीक करा आणि ते मिश्रण शिजू द्या.

पाच ते दहा मिनिटानंतर गॅस बंद करा. कुकर थोडा थंड होऊ द्या. त्यानंतर शिजलेल्या भातावर कोथिंबिरीचे गार्निशिंग करून तुम्ही ही डिश सर्व्ह करू शकता.

loading image