गरमीच्या दिवसात थंड करणारे शेवया कस्टर्ड; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी सर्वांच्या पसंतीस उतरू शकते
गरमीच्या दिवसात थंड करणारे शेवया कस्टर्ड; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात (summer season) अनेकदा थंड पदार्थ खाण्याचे मन होते किंवा तोंडाला चव येते. त्यामुळे आज आणि तुम्हाला शेवयांचे कस्टर्ड रेसिपी सांगणार आहोत. ही बनवण्यासाठी सोपी आहेच शिवाय टेस्टी आहे. लहान मुलांना (child) हा पदार्थ खूप आवडतो. दूध (milk) आणि शेवयापासून तयार होणाऱ्या या रेसिपीमध्ये वेगवेगळी फ्रुट्स (fruits) घातल्यानंतर याला वेगळा स्वाद येतो. काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी सर्वांच्या पसंतीस उतरू शकते.

साहित्य -

  • तुप - 2 चमचे

  • शेवया- 1/2 कप

  • दूध- 500 एमएल

  • केशर

  • इलायची पाउडर- 1/2 चमचे

  • व्हॅनीला कस्टर्ड- 2 चमचे

  • थंड दूध- अर्धी वाटी

  • साखर- 1/4 कप

  • काजू- 6 से 7

  • बदाम- 6 से 7

  • केळी - 2 (स्लाइस शेप मध्ये)

  • डाळिंब दाणे- 1 वाटी

  • आंबा- 1 वाटी (बारीक तुकडे)

गरमीच्या दिवसात थंड करणारे शेवया कस्टर्ड; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी आता भाजपाचा टास्क फोर्स

कृती -

सुरुवातीला एका पॅनमध्ये शेवया भाजून घ्या आणि त्या थंड होऊ द्या. दुसऱ्या एका बाजूला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दूध घाला. हे दूध दोन-तीन मिनिटांसाठी उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर यामध्ये केशर, इलायची पावडर, भाजलेल्या शेवया मिक्स करा. पाच ते सहा मिनिटांसाठी उकळून घ्या. मंद आचेवर हे मिश्रण शिजवून घ्या. जोपर्यंत शेवया शिजत आहेत. त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करा. एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर चार ते पाच चमचे आणि त्यामध्ये थंड दूध मिक्स करा. या तयार मिश्रणात शेवया शिजल्या आहेत का ते पहा. यामध्ये साखर, काजू, बदाम मिक्स करा. शेवया शिजल्यानंतर तयार असलेले कस्टर्ड मिक्सर यामध्ये घाला. शेवया क्रिमी दिसयला लागल्यास गॅस बंद करून थंड होऊ द्या. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.आईस्क्रीम क्लासमध्ये पहिल्यांदा डाळिंबाचे तुकडे, केळाचे स्लाईस त्यानंतर थंड कस्टर्ड शेवयाचे मिश्रण, आंब्याचे तुकडे घालून यावर शेवयांचे मिश्रण घाला. शेवटी बदामाचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घालून गार्निश करा. शेवया कस्टर्ड तयार आहे. आता तुम्ही खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com