Food To Avoid On Empty Stomach: रिकाम्या पोटी 'या' पाच गोष्टी खाल्ल्यानंतर होते नुकसान ; जाणून घ्या उपाय

Food To Avoid On Empty Stomach tips food martahi news 
Food To Avoid On Empty Stomach tips food martahi news 

कोल्हापूर :  काही खाण्याच्या व पिण्याच्या सवयी अशा असतात ज्या  रिकाम्या पोटी खाल्यांनंतर आपले  प्रचंड नुकसान होते.  याचा परिणाम केवळ पचनशक्तीवर होतो असे नाही तर यापासून अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.  अशा आहाराबाबत आपण जाणून घेणे आवश्यक आहे.आपले आरोग्य चिकित्सेत सुद्धा काही गोष्टी सकाळी खाण्याचा सल्ला देतात. 
*खास करून सकाळी गरम पदार्थ जसे कोमट पाणी लेमन टी वगैरे घ्या.

अशी करा दिवसाची सुरुवात

*खास करून सकाळी गरम पदार्थ जसे कोमट पाणी लेमन टी वगैरे घ्या. 
*रिकाम्यापोटी चहा-कॉफी घेऊ नका.
 *नाश्त्यामध्ये  कच्च्या भाज्यांचा समावेश करू नका.
 
तुम्ही तुमच्या  दिवसाच्या सुरुवातीस काय सेवन करता यावर पोटाचे स्वास्थ्य अवलंबून असते. काही खाण्याचे पदार्थ  असे असतात त्याचा परीणान रिकाम्या पोटावर मोठा होतो. आणि ते शरीराला नुकसानही पोचवतात. यातून आपली पाचनशक्ती बिघडते तसेच आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. सकाळी रिकाम्या पोटी  काय खाऊ नये या गोष्टी आपण जाणून घेऊया. 

सेलिब्रिटीच्या विशेष सल्लागार  ऋतुजा दिवेकर सांगतात की, तुम्ही सकाळीची सुरुवात चहा-कॉफी यांनी करू नये. अनेकांना ॲसिडीटी, छातीमध्ये जळजळ अथवा डिहायड्रेशन होते. सकाळी पहिल्यांदा चहा कॉफी न घेता सुद्धा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करू शकता.  दिवेकर यांच्या मते आपल्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या आहाराने होणे आवश्यक आहे. यासाठी एक  मुठ  भिजलेले बदाम आणि मनुके खाणे आवश्यक आहे. त्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे त्यानंतर तुम्ही चहा-कॉफी घेऊ शकता.

 रिकाम्या पोटीवर  हे अजिबात खाऊ नये
आपली सकाळची दिनचर्या खुप महत्वाची असते.  म्हणून असे काही खाद्यपदार्थ आहेत जे आपण कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत ते कोणते जाणून घेऊया

1) Aerated Drinks : 

पेय आपल्या शरीरासाठी खूप नुकसान कारक असते. तुम्हाला दिवसभर वेळ नसला तरी रिकाम्या पोटी घेतलेल्या  Aerated Drinks मुळे ळे गॅसचा त्रास होतो त्यामुळे जर असे ते तुम्ही सकाळी घेत असाल तर ते तात्काळ बंद करा
 
2) Spicy Food :
 
आपल्या  नाश्त्यामध्ये सुरुवातीलाच मसालेदार पदार्थ खाणे आणि त्यानंतर काहीच न खाणे यामुळे पोटामध्ये जळजळ होऊ शकते.  ही समस्या अत्यंत त्रासदायक ठरते. यामुळे काही वेळातच तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो आणि हा त्रास अनेक तास तुम्हाला सहन करावा लागतो.

3) Cold Beverages:
नेहमी सकाळी कोमट पाणी, लेमन टी किंवा आले घातलेला चहा घ्या. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला  मदत मिळते. न्यूट्रिशनिस्ट रुपाली दत्ता यांच्या मते कोल्ड कॉफी अथवा अन्य थंड पदार्थ घेतल्यामुळे शरीराच्या आतड्याचे  मोठे नुकसान होते. तसेच तुमची पचनशक्ती सुस्त बनून राहते.

4)Raw Vegetables:
  कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे तुमच्या वजनामध्ये नक्कीच घट होते. परंतु हे खाताना सुद्धा काही गोष्टी आपण ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कच्च्या पालेभाज्या रिकाम्यापोटी खाल्ल्यानंतर आपल्या पचनसंस्थेवर अतिरिक्त भार पडतो. यातून आपल्याला पोट दुखी किंवा पोट फुगणे यासारखी  समस्या भेडसावू शकते.

5) Citrus Fruits :
 सकाळी रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्यानंतर अतिरिक्त ॲसिड पोटामध्ये निर्माण होते. फळांमध्ये अतिरिक्त फायबर्स असतात जे रिकामी पोटावर घेतल्यानंतर त्याचा अतिरिक्त भार   पडतो.

 आपल्या दिवसाची सुरुवात भिजलेल्या बदामाने अथवा कोमट पाण्याने करा त्यानंतर योगासन आणि व्यायाम करा त्यानंतर तुमचे दिवसभराचे जेवन आणि दिनचर्या सुरू ठेवा.

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com