
Food: पौष्टिक करवंदाची चटणी कशी तयार करायची?
Conkerberry: उन्हाळ्यात आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच करवंदासारखा रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात. आजच्या लेखात आपण पौष्टिक करवंदाची चटणी कशी तयार करायची? याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य:
गाभोळी पंधरा ते विस करवंद
लसुण
जिरं
हिरव्या मिरच्या
गुळ
चवीनुसार मिठ
कृती:
सर्वप्रथम करवंदे धुवुन पुसुन कोरडी करून घ्यावी. मग सुरीने मधुन चिरुन दोन भाग करुन बिया काढुन घ्याव्यात.लसणाच्या पाकळ्या, जिरं, मिठ, हिरव्या मिरच्या करवंदाचे काप आणि खिसलेला गुळ सगळे एकत्रच मिक्सरला फिरवुन घ्यावे. नंतर मस्त हिंगाची फोडणी द्यावी अशा रितीनेआपली चटपटीत आंबट- गोड, तिखट चटणी जेवणाची लज्जत वाढवायला तयार आहे.