आरोग्यदायी चांगले तेल कसे निवडायचे ? चला जाणून घ्या..

आरोग्यदायी चांगले तेल कसे निवडायचे ? चला जाणून घ्या..

जळगावः भारतात हद्यविकराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून जगातील 60 टक्के हृदय रुग्ण हे केवळ भारतातील आहेत. त्यामुळे गेल्या 25 वर्षांत हदविकाराच्या रुग्णाच्या मृत्यूच्या संख्या वाढली आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे आपले बिघडलेले जिवनशैली आहेत. त्याच सोबत आपल्या स्वंयपाकगृहातील बदलेले पदार्थ. यात पूर्वी असलेला संतुलित आहार तो आता राहिलेला नसून त्याची जागी आता फास्टफूड, तळलेले पदार्थांनी घेतली आहे. त्यामुळे आपल्या हदयावर याचा परिणाम मोठो होतो. तसेच स्वयंपायाकासाठी आपण कोणते तेल आपण वापरतो, आपल्या शरिसाठी हे तेल योग्य आहे, यात कोणते घटक हवे, कोणते नाही याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे कोणत्या तेलाच आपण निवड करावी याबाबत चला जाणून घेवू...


उच्च ओमेगा -3 
ओमेगा 3 तेल हे सीफूडचे असून या ओमेगा ३ या तेलाने आपल्या शरिरातील रक्ताची कोलेस्टेरॉल जाळतो व रक्तप्रवाह नियंत्रीत करतो. जर आपण शाकाहारी असाल तर आपल्या स्वयंपाकगृहात या तेलाचा वापर करू शकतात. 

ओमेगा -6 ते ओमेगा -3 चे आदर्श प्रमाण
स्वयंपाकाच्या तेलाचे ओमेगा -6 ते ओमेगा -3 चे प्रमाण 5 ते 10 दरम्यान असावे असे भारतीय संशोधकांनी सोशधान नमुद केले आहे. हे प्रमाण वापरासाठी योग्य आहे.

उच्च मोनोसॅच्युरेटेड फॅटी सिडस् (एमयूएफए)
मोनोसॅच्युरेटेड फॅटचे अनेक फायदे आहेत. स्वयंपाक करतांना तेलाचे शोषण कमी करते. तसेच अन्न हलके होवून अन्न पचन करणे सोपे होते. हे पौष्टिक घटक आणि त्यांची चव टिकवून ठेवण्यास मदत करते.

कमी संतृप्त चरबी
तूप, नारळ तेल आणि बेकरी उत्पादनांमधून मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण राहते. स्वयंपाकाच्या तेलात कमी सॅच्युरेटेड फॅटी सिड असणे चांगले. संतृप्त चरबीचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. 

गामा ओरिजनॉल
गामा ओरिजनॉल हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवितो. जर आपल्याला हृदयाचे आरोग्य सुधरायचे आहे तर गॅमा ओरिजिन शोधणे तेलेच्या घटकांच्या यादीमध्ये शोधणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन ए, डी आणि ई
.व्हिटॅमिन ए डोळ्यांचा प्रकाश सुधारतो आणि तणाव आणि खराब जीवनशैलीमुळे होणारे नुकसान सुधारण्यात देखील मदत करते. रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि यामुळे आपली हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन ई एक अँटीऑक्सिडेंट आहे जो आपल्या शरीरात मुक्त रॅडिकल्स कमी करतो. जर आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यासाठी हे सर्व घटक आवश्यक असतील तर मग यापेक्षा चांगले काय असेल?

या गोष्टी लक्षात असू द्या...
* तेल घटकाच्या यादीत फक्त दोन किंवा तीन घटक महत्वाचे आहेत, उर्वरित घटक तेलात फारच कमी आहेत.
* हायड्रोजनेटेड तेलाचे सेवन करू नका.
* आहार चागंला होण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करा. 
* दोन्ही तेलांचे प्रमुख घटक पूर्णपणे भिन्न आहेत, जेणेकरून आपल्याला सर्व पोषण मिळू शकेल.
* तांदळाचा कोंडा, शेंगदाणा, तीळ तेल, मोहरी तेल, सोयाबीन तेलाचा उपयोग दररोज केला जाऊ शकतो.
 * फुलांच्या तेलासह मोहरीच्या तेलाचे संयोजन पौष्टिकतेसाठी योग्य असेल.
* तळलेल्या पदार्थांचे शक्य होईल तेवढे कमी खावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com