esakal | नैवेद्यात आहे महत्त्वाचं स्थान; जाणून घ्या, आंबट-गोड पंचामृताची रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

नैवेद्यात आहे महत्त्वाचं स्थान; जाणून घ्या, पंचामृताची रेसिपी

नैवेद्यात आहे महत्त्वाचं स्थान; जाणून घ्या, पंचामृताची रेसिपी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेक ठिकाणी कोणतंही शुभकार्य किंवा शुभप्रसंग असला की नैवेद्यासाठी आंबट-गोड पंचामृत हमखास केलं जातं. साधारणपणे मध,साखर,दूध, तूप आणि दही यांच्यापासून तयार केलेलं पंचामृत साऱ्यांनाच ठावूक असेल. परंतु, या व्यतिरिक्तही पंचामृताचे अनेक प्रकार आहेत. म्हणूनच त्या प्रकारांपैकी आंबट-गोड आणि किंचितसं तिखट पंचामृत कसं करावं ते पाहुयात.(food-recipe-homemade-panchamurt-recipe)

साहित्य -

चिंच - लहान वाटी ( लिंबाएवढी)

गूळ - चिंचेपेक्षा दुप्पट

हिरव्या मिरच्या - ४

खोबऱ्याचे काप - मूठभर

भिजवलेले शेंगदाणे - मूठभर

तिळाचा कूट - २ टेबलस्पून

गोडा मसाला - २चमचे

मीठ- चवीनुसार

फोडणीचं साहित्य

कृती -

प्रथम चिंचेच्या बिया काढून चिंच स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात भिजवून तिचा साधारणपणे १ वाटी कोळ काढा. या कोळामध्ये मावेल तितका गूळ घाला. तुमच्या आवडीनुसार, चिंच-गुळाचं प्रमाण ठरवा. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरं, हिंग कढीपत्ता आणि हळद यांची खमंग फोडणी करा. या फोडणीमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व भिजवलेले शेंगदाणे घाला. मंद आजेवर सगळे पदार्थ मिक्स करा. आता यात तिळाचा कूट घाला. त्यानंतर गोडा मसाला व चिंच-गुळाचं मिश्रण टाका. सगळ्यात शेवटी मीठ आणि पाणी आवश्यकतेनुसार घाला आणि ३-४ मिनीटे छान शिजवून घ्या. अशा प्रकारे नैवेद्यासाठी लागणारं आंबट-गोड पंचामृत तयार.

loading image