esakal | तुमची भूक वाढवणारी रेसिपी गार्लिक मशरूम

बोलून बातमी शोधा

garlic mushrooms recipe made by home tips food marathi news}

मशरूम आता आपल्या खाद्यपदार्थात आवडीचे पदार्थ बनले आहे या मशरूम पासून आपण विविध पदार्थ तयार करू शकतो.

तुमची भूक वाढवणारी रेसिपी गार्लिक मशरूम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: मशरूम आता आपल्या खाद्यपदार्थात आवडीचे पदार्थ बनले आहे या मशरूम पासून आपण विविध पदार्थ तयार करू शकतो. मशरूम आणि लसुन याची  एक वेगळी रेसिपी तयार करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. झटपट बनणारी आणि भूक वाढवणारी ही रेसीपी आहे. चला तर जाणून घेऊया 

यासाठी लागणारे साहित्य 

20 बटन मशरूम स्वच्छ केलेले 

एक कप चेडर चीज, दोन चमचा बटर रूम टेंपरेचर मध्ये असलेले, 5 लसून  पाकळ्या ,लहान कापलेले,पाव कप पासले  कापलेले, जरुरीनुसार मिठ,अर्धा चमचा ब्लॅक पेपर बारीक केलेले


कृती
 
ओव्हन 190 डिग्री सेल्सियस वर ठेवा.
 लसुन, बटर, चीज, पासले आणि ब्लॅक पेपर हे सर्व सहित्य एकत्रित चांगल्या पद्धतीने मिक्स करा.
 स्वच्छ केलेले मशरुम चे डेट काढून त्याला कापून घ्या 
त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले मिश्रण भरा.
 हे  मशरूम बेकिंग शीट मध्ये ठेवा आणि पंधरा मिनिटे ओव्हन सुरू ठेवा.स्वादिष्ट आणि गरमागरम स्टफ्ड मशरूम आता खाण्यासाठी तयार झालेले असेल.