अ‍ॅसिडिटी होतेय ? मग आवळा खा! जाणून घ्या आणखी फायदे

टीम ईसकाळ
Wednesday, 25 November 2020

आवळ्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आवळ्यामध्ये खूप सारे औषधी गुण असतात म्हणूनच आयुर्वेदिक औषध बनिवताना आवळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आवळ्याच्या बिया आणि सालीमध्येसुद्धा औषधी गुणधर्म असतात

आवळा म्हंटल तरी, तुरट, आंबट व गोड अशी चव जीभेवर रेंगाळते. आवळा हा पचयाला हलका आणि  थंड (शीतल) असतो. उलटी, सुज, थकवा, बध्दकोष्ठता (कॉन्स्टीपेशन), गॅस (वायू) सारख्या समस्यांवर हितकारक ठरतो. 

अत्यंत गुणकारी असतो आवळ्यामध्ये खूप पोषक तत्त्व असतात जे निरोगी राहण्यासाठी गुणकारी ठरतात. आधुनिक संशोधनानुसार, आवळ्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात अ‍ॅस्कॉर्बिक अ‍ॅसिड (विटॅमिन सी) असते. विशेष म्हणजे, आवळा शिजविला तरी त्यातील विटॅमिन सी नष्ट होत नाही. आवळ्यामध्ये आयर्न(लोह) असते जे अ‍ॅनिमिया आणि शरीरातील लोहची कमतरता दुर करतात.  आवळा त्वचा , केस आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. 

Organic Gooseberry Amla, Pesticide Free (for Raw Products), Rs 40 /piece |  ID: 17971659588

आवळ्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आवळ्यामध्ये खूप सारे औषधी गुण असतात म्हणूनच आयुर्वेदिक औषध बनिवताना आवळ्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आवळ्याच्या बिया आणि सालीमध्येसुद्धा औषधी गुणधर्म असतात.

चला, तर मग जाणुन घेऊ या आयुर्वेदाचे आणखी फायदे 

1. अ‍ॅसिडीटी (पित्त) :
आवळ्या नियमित खाल्यास पित्त आणि पचनाचे त्रास कमी होतात. आवळा आंबट असल्याने वात कमी करतो,  गोड आणि थंड असल्याने पित्त कमी करतो, तुरट आणि रुक्ष असल्याने कफ कमी करतो.  आवळा त्रिदोषाचे संतुलन करणारा असला तरी प्रामुख्याने पित्त कमी करतो. तसेच पोटाच्या आजारांवर देखील आवळा अत्यंत गुणकारी ठरतो.

2. इनफेक्शन(संसर्ग) :
 संसर्ग विषाणुसह लढण्यासाठी  आणि शरीरातील घातक घटक बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरतोय. आवळाचे नियमित सेवन केल्यास व्हायरल इन्फेक्शन होत नाही.

3. इम्युनिटी(रोगप्रतिकारशक्ती) :
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठई आवळा खाणे अत्यंत लाभदायक ठरते. सर्दी-पडसे सारख्या आजारांना दुर ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो.

4.डोळे : 
आवळ्यामध्ये असे गुणकारी पोषक त्तव असतात जे डोळ्यांच्या दृष्टी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासाठी आवळा लाभदायक आहे.

5. मधुमेह :
मधूमेहाचा आजार असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी आवळ्याचे नियमित सेवन करावे.  मधूमेहाचा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Plantsworld Amla Small Live Plant (Green): Amazon.in: Garden & Outdoors

आवळ्याचे सेवन कसे करावे?
 1. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरे पूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास १५ दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो
 2.पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो. 
 3. आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते. 
4.  आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरे पूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते

(Edited by Sharayu Kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health benefits of Amla Useful for acidity Diabetes Immunity eye and Infection