Green Kabab : ग्रीन कबाब

Green Kabab recipe
Green Kabab recipe sakal

साहित्य ः १ वाटी पनीर, १ वाटी उकडलेला पालक, १ वाटी वाफवलेले मटार, ४ चमचे फुटाण्याचे/डाळ्याचे पीठ, दीड चमचा छोले मसाला, १ चमचा आले-लसून पेस्ट, अर्धा चमचा आमचूर पावडर, १ मोठा कांदा, ३ चमचे कसुरी मेथी, गरजेप्रमाणे हिरवी मिरची, ३-४ चमचे भाजलेले ओट्स, ब्रेड स्लाइस

कृती ः पनीर किसून घ्या. पालक बारीक चिरा. उकडलेला वाटाणा हाताने कुस्करून घ्या. ब्रेड मिक्सरमधून काढून घ्या. डाळ्याचे पीठ वगळता सर्व एकत्र करा. आता याता मावेल इतके डाळ्याचे पीठ घाला. छोटे टिक्के करून पॅनवर दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करा. पुदिना किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खाता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com