उन्हाळ्यात मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी 'फ्रूट टिंगल Mocktail'

Sakal - 2021-03-05T162021.314.jpg
Sakal - 2021-03-05T162021.314.jpg

नाशिक : मॉकटेल म्हणजे विविध फळांपासून तयार होणारे पेय वा ड्रिंक म्हणून याची ख्याती आहे. मॉकटेल हे नॉन-अल्कोहोलिक असतात. म्हणजे यात मद्याचा वापर केला गेलेला नसतो. याच्या सेवनाने धुंदी येत नाही. पण ही पेय आरोग्यवर्धक दृष्टीने किंवा एन्जोयमेंटसाठी सुद्धा सेवन केली जातात. आज आपण याच मॉकटेलच्या विविध रेसिपी जाणून घेणार आहोत, ज्या या उन्हाळ्यात तुमच्या शरीराला थंडावा देतील आणि मन खुश करतील. फ्रुट टिंगल मॉकटेल रेसिपी अतिशय सोपी आणि उन्हाळ्यात आवडती आहे. संत्र्याचा गोडपणा आणि लिंबाचा आंबटपणा मिळून. एकूणच एक मजेदार मॉकटेल तयार करा

साहित्य

15 मिली ब्ल्यू कुरॅको

30 मिली संत्र्याचा रस

15 मिली लिंबू पाणी

15 साखर सिरप

स्प्राइट किंवा सोडा

बर्फाचे तुकडे

गार्निशिंगसाठी संत्र्याचे तुकडे आणि चेरी

कृती
- ग्लास मध्ये बर्फ भरा.
- ब्लू कुरको आणि लिंबू पाणी घाला आणि मिक्स करावे.
-संत्र्याचा रस घाला आणि नंतर सोडा किंवा स्प्राइटने भरा.
-संत्र्याचे काप किंवा मारॅसिनो चेरीने सजवा.
-तयार आहे तुमचं 'फ्रुट टिंगल'


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com