असा बनवा पपईपासून टुटी फ्रुटी व जॅम

विश्वास कदम
Tuesday, 25 February 2020

असा बनवा पपईपासून टुटी फ्रुटी 
- एक किलो कच्च्या पपईच्या गराचे चौकोनी टुकडे कापून घ्यावेत.
- अर्धा लिटर पाण्यात चार टी-स्पून चुना मिसळून त्यात पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावेत. तुकडे दुसऱ्या पाण्यात दोन ते तीन वेळा धुऊन पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधून तीन ते पाच मिनिटे वाफवून घ्यावेत. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्यात ठेवावेत.
- एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्यावा व त्यामध्ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावेत. तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्यामध्ये सायट्रिक ऍसिड मिसळावे.

- पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये तुकडे व आवडीनुसार रंग घालून मिसळावे व हे मिश्रण दोन ते तीन दिवस ठेवावे.
- तुकड्यांमध्ये पाक चांगला शिरल्यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटी फ्रुटी बरणीत भरून ठेवावी.

असा बनवा पपईपासून जॅम 
-  पिकलेली पपई पाण्याने स्वच्छ धुऊन कापून घेऊन बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्‍सरमध्ये एकजीव करावा.
- साधारण एक किलो गरामध्ये साडेसातशे ग्रॅम साखर व नऊ ग्रॅम सायट्रिक ऍसिड मिसळून मंद गॅसवर एकशेतीन अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावे. त्यातील प्रवाही पाण्याचा अंश संपला की जॅम तयार झाला, असे ओळखावे. जॅम थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये भरावा.

Image result for पपईपासून जॅम

अधिक माहितीसाठी संपर्क ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, राहुरी.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to make tutti frutti and jam from papaya