esakal | Idli tikka recipe: याची चव एकदा चाखाच
sakal

बोलून बातमी शोधा

Idli tikka recipe: याची चव एकदा चाखाच

Idli tikka recipe: याची चव एकदा चाखाच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

अनेकांना साउथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडतात. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने या डिशेशचा स्वाद घेतात. त्यातीलच एक इडली. हे साउथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन क्यूजिनचा एक कॉम्बिनेशनची रेसिपी आहे, जे तुम्ही काही मिनिटांत तयार करू शकता, तुम्हाला इडली टिक्का हि झटपट रेसिपी जरूर आवडेल.

हेही वाचा: Spicy Potato Bread Roll: चहासोबत याचा आनंद घ्या; एकदम सोपी रेसिपी

साहित्य:

- इडली- ७-८

- शिमला मिरची- २ मध्यम

- लहान कांदे - ४

- दही- १/२ कप

- टोमॅटो केचअप- १ टेस्पून

- लाल तिखट- १/४ टीस्पून

- धणे पूड १/२ टीस्पून

- जिरेपूड १/४ टीस्पून

- कसुरी मेथी १/४ टीस्पून

- गरम मसाला १/४ टीस्पून

- मीठ चवीनुसार

- मोहरीचे तेल १ टीस्पून

हेही वाचा: टेस्टी आणि हेल्दी ऑईल फ्री पालक पकोड्याची झटपट रेसिपी पाहाच

कृती:

- सुरवातीला इडली लहान लहान आकाराचे कापून घ्या आणि कंटेनरच्या आत ठेवा.

- त्यानंतर दही आणि सर्व मसाल्यांबरोबर लिंबाचा रस आणि मोहरी घाला.

- ते चांगले मिसळा आणि मग इडलीचे तुकडे घाला आणि 30 मिनिटे बाजूला ठेवा.

- स्क्यूअर धुवा किंवा लांब टूथपिक घ्या.

- शिमला मिरची आणि कांदा घातल्यानंतर इडलीचे तुकडे घाला

- तवा गरम करून तव्यावर तुपाचे काही थेंब किंवा तेल घाला.

- दोन्ही बाजूंनी इडली 5-6 मिनिटे शिजवा.

- पुदीना चटणी सोबत सर्व्ह करा.

loading image