Hulk of an Orange : जाणुन घ्या, का होतेय नागपुरची संत्री ट्विटरवर ट्रेंड?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या या संत्री बघून तुम्हीही आवाक व्हाल. रितु मल्होत्रा यांनी ट्विटरवर या संत्र्याचा फोटो पोस्ट केला आहे. या संत्र्याची रुंदी २४ इंच आणि उंची ८ इंच असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत या संत्र्याचे वजन १ किलो ४२५ ग्रॅम आहे.  तुम्हीही हा संत्री पाहून थक्क झाला असाल ना!

India's Biggest Orange : तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातील नागपूर शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिध्द आहे. पण सध्या ही नागपुरची संत्री ट्विटरवर ट्रेंड होत आहे. नागपुरमधील एका संत्र्याचा फोटो सध्या टिव्टरवर व्हायरल होत आहे.  

ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या या संत्री बघून तुम्हीही आवाक व्हाल. रितु मल्होत्रा यांनी ट्विटरवर या संत्र्याचा फोटो पोस्ट केला आहे. या संत्र्याची रुंदी २४ इंच आणि उंची ८ इंच असून २३ नोव्हेंबर २०२० पर्यंत या संत्र्याचे वजन १ किलो ४२५ ग्रॅम आहे.  तुम्हीही हा संत्री पाहून थक्क झाला असाल ना!

 ट्विटरवर देखील या संत्र्यावर नेटकऱ्यांना थक्क केले आहे.  हे फोटोज रिट्विट करत नेटकरी रिअॅक्ट करत आहे. काही लोक थक्क होत आहेत तर काही लोक तर काही लोक असेही म्हणतायेत, की रिअॅलिटीमध्ये तो वेगळ्या जातीचा संत्री आहे. एवढ्या मोठ्या संत्र्याची साल काढून डोळ्यात रस उडवायला मज्जा येईल अशी गंमतीशीर प्रतिक्रिया देखील काही लोक करत आहे.

गिनिज वल्ड रेकार्डनुसार , अशा प्रकारचा सर्वात मोठी संत्री २५ इंचाचा होता. २२ जानेवरी २००६ ला कॅलिफॉर्निया येथील फेन्स्रो मध्ये पॅट्रीक आणि जोआन फिल्डर  यांनी हा रेकॉर्ड सेट केला होता. नागपूरच्या संत्र्याची जवळपास २४ इंच आहे. भारतातून हा वल्ड रेकॉर्ड लवकरच तोडला जाईल असे अपेक्षा केली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's Biggest Orange found in Nagpur Photo Viral on twitter