झटपट बनवा तीन प्रकारचे पुलाव, अवघ्या ३० मिनिटांमध्ये

पश्तुनी जर्दा पुलाव
पश्तुनी जर्दा पुलाव
Summary

खाण्यासाठी झटपट काय करावे बरं? असा प्रश्न सारखा पडत असेल तर आम्ही तुम्हाला अशाच झटपट बनवता येणाऱ्या पुलाव रेसिपीविषयी Pulao Recipe सांगणार आहोत.

पावसाळ्यात काही चटपटीत आणि मसालेदार खावेसे वाटते. प्रत्येक दिवशी काय नवीन बनवावे? लहान मुले आणि मोठ्यांसाठी असे काय बनवावे ज्याने त्यांचे पोटही भरेल. तसेच ते चवीष्टही लागेल. अनेकदा लवकर काय बनवावे हेच कळत नाही. जर तुम्हाला हा प्रश्न छळत आहे का? तर याची चिंता करु नका. आम्ही तुम्हाला काही पुलावच्या काही सोप्या रेसिपी सांगणार आहोत. जे लवकरही होईल आणि चवीष्ट ही लागेल. instant pulao recipes within 30 minutes marathi news तर चला त्याविषयी जाणून घेऊ या...

पश्तूनी जर्दा पुलाव

कोणताही विशेष प्रसंग असो त्यात पश्तूनी जर्दा पुलाव जरुर बनवले जाते. त्यात शेंगदाणे, केसर आणि खोबर आदी टाकले जाते. चवीबरोबरच ते आरोग्यासाठी ही चांगले आहे. जर्दा शब्द फारसीतून घेण्यात आले आहे. त्याचा अर्थ पिवळा असा होतो. हा पुलाव केवळ ३० मिनिटांमध्ये बनवला जाऊ शकतो.

साहित्य

- एक कप भिजवलेले बासमती तांदूळ

- चिमुटभर केसर

- १/४ कप मनुके

- ३-४ छोटी इलायची

- १ तुकडा दालचिनी

- ४ मोठे चमचे तूप

- एक चमचा लिंबाचा रस

- एक कप साखर

- अर्धा कप काजू आणि बदाम

- अर्धा कप बारीक कापलेले खोबर

-२-३ लवंग

- एक तेजपत्ता

- ५० ग्रॅम खवा

- अर्धा लिटर पाणी

- अर्धा चमचा खाण्याचा रंग

पाककृती

- एका पॅनमध्ये पाणी टाका आणि ते उकळून घ्या.

- आता त्यात तांदूळ, इलायची, लवंग, तेजपत्ता आणि दालचीनी टाकून ८० टक्क्यांपर्यंत तांदूळ शिजवून घ्या.

- भात शिजल्यानंतर उरलेले पाणी टाकून द्या. एका प्लेटमध्ये भात पसरुन घ्या.

- दुसरा पॅन घ्या आणि त्यात तूप टाकून गरम करायला ठेवून द्या. त्यात खोबर, काजू, मनुके आणि बदाम टाकून मध्यम आंचवर तळून घ्या.

- आता त्यात साखर आणि केसरचे पाणी टाका. साखर विरघळेपर्यंत गरम करा. आता पॅनमध्ये खाण्याचा रंग, लिंबाचा रस टाकून २-३ मिनिटे आणखीन शिजवा.

- या मिक्स्चरमध्ये शिजलेला भात टाकून चांगल्या प्रकारे गरम करा. त्याला मध्यम आंचवर १५ मिनिटांसाठी ठेवा आणि शेवटी खवा टाका.

- सर्वकाही चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. तुमचे जर्दा पुलाव तयार झाले. ते गरमागरम खा.

व्हेज पुलाव
व्हेज पुलाव

व्हेजिटेबल पुलाव

रेस्तराँमधून मिळणारा पुलाव कधी घरी बनवण्याचा विचार केला का ? व्हेज पुलाव घरीत बनवणे खूप सोपे आहे.

साहित्य

- एक कांदा

- ८-१० बिन्स

- एक कोबी

- एक गाजर

- एक कप मशरुम

- एक कप बासमती तांदूळ

- आधा कप मटर

- ३-४ लवंग आणि काळी मिरची

- २-३ छोट्या इलायची

- एक मोठी इलायची

- एक तुकडा दालचीनी

- अर्धा चमचा जिरा

- एक तेजपत्ता

- ५० ग्रॅम बटर

- दोन कप पाणी

- मीठ चवीनुसार

- दोन चमचे लिंबाचा रस

पाककृती

- सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक कापून ठेवून द्या.

- एक कढई घ्या आणि ती गरम करण्यासाठी ठेवून द्या. त्यात बटर किंवा तूप टाका. बाकी मसालेही टाका आणि १-२ मिनिट ठेवा.

- आता त्यात बारीक केलेला कांदा टाका आणि ते सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

- आता त्यात सर्व भाज्या टाका आणि ती ही चांगल्या प्रकारे ३-४ मिनिटांपर्यंत तळून घ्या. जेव्हा भाज्या नरम होतील तेव्हा त्यात तांदूळ टाका.

- सर्व एकत्र करुन शिजवा. आता त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाका. आता कढईत पाणी, लिंबाचा रस आणि झांकण ठेवून १०-१५ मिनिटांपर्यंत शिजवा.

- १०-१५ मिनिटांपर्यंत गॅस बंद करा आणि काही वेळ पुलावावरील झांकण हटवू नका. १० मिनिटानंतर प्लेटमध्ये गरमागरम पुलाव घ्या आणि खाण्याचा आनंद घ्या.

पनीर पुलाव
पनीर पुलाव

पनीर पुलाव

भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पनीर पुलाव बनवून खाऊ शकता.

साहित्य

- एक कप बासमती तांदूळ

- एक कप पनीर ( छोटे तुकडे केलेले)

- अर्धा कप मटर

- अर्धा कप मक्याचे दाणे

- एक कप तूप किंवा बटर

- एक छोटा चमचा जिरा

- ८-१० कढीपत्ता

- अद्रक-लसूणचे पेस्ट

- बारीक केलेल्या दोन मिरच्या

- मीठ चवीनुसार

- अर्धा चमचा गरम मसाला

- दोन कप पाणी आणि बारीक कापलेली कोथिंबीर

पाककृती

- सर्वप्रथम तांदूळ चांगल्या प्रकारे धुवून ठेवून द्या.

- जर तुम्हाला तांदूळ फुगलेला हवा असेल तर तो १५ मिनिटे पाण्यात भिजून ठेवा.

- आता एक पॅनमध्ये तूप किंवा बटर गरम करुन घ्या. त्यात जिरा टाका आणि पुन्हा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि अद्रक-लसूणचे पेस्ट टाकून काही सेकंद गॅस ठेवा.

- आता पॅनमध्ये मटर, मका आणि पनीर टाकून चांगल्या प्रकारे तळून घ्या. ते १-२ मिनिटे झाकण ठेवून शिजवा आणि पुन्हा तांदूळ टाकून काही वेळ.

- त्यात चवीनुसार मीठ आणि गरम मसाला टाका. सर्व घटक मिक्स करुन घ्या. गरजेनुसार पाणी टाकून उकळी येईपर्यंत शिजवा. एक उकळी आल्यानंतर कमी आंचवर १५ मिनिटे शिजवा.

- तुमचे पनीर पुलाव तयार. बारीक केलेली कोथिंबीर टाकून खायला सुरुवात करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com