Gudhi Padwa | गुढीपाडव्याला हवं असेल गोडधोड तर पटकन करा केशर श्रीखंड keshar shrikhand recipe for Gudhi Padwa festival food maharashtrian dessert | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

keshar shrikhand

Gudhi Padwa : गुढीपाडव्याला हवं असेल गोडधोड तर पटकन करा केशर श्रीखंड

मुंबई : श्रीखंड हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे. आईस्क्रीमप्रमाणे श्रीखंडामध्येही वेगवेगळे फ्लेवर्स लोकांना आवडतात.

असाच एक फ्लेवर म्हणजे केशर श्रीखंड. सर्व वयोगटातील लोकांना हा पदार्थ आवडतो. खरंतर एरव्ही कधीही हा पदार्थ घरी तयार करता येतो किंवा बाहेरून आणता येतो; पण सणासुदीला याचं विशेष महत्त्व असतं. यंदाच्या गुढीपाडव्या काही नवीन करायचं असेल तर केशर श्रीखंड नक्की ट्राय करा. हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य.... (keshar shrikhand recipe for Gudhi Padwa festival food maharashtrian dessert)

श्रीखंड फार कठीण नाही. यात तयारी करायलाच ४० मिनिटे लागतात. त्यानंतर फक्त १० मिनिटांत श्रीखंड तयार होते. म्हणजेच श्रीखंड तयार करण्यासाठी एकूण ५० मिनिटे गरजेची आहेत.

सध्या डाएटवर असणाऱ्यांसाठी विशेष माहिती - केशर श्रीखंडामध्ये ११३ कॅलरीज असतात.

साहित्य ( एका व्यक्तीसाठी )

५० ग्रॅम क्रीम चीज

२ चमचे साखर

१/४ टीस्पून भिजवलेले केशर

१/४ कप दही

१/२ टीस्पून बारीक पिस्ता

१ टीस्पून चिरलेला पिस्ता

कृती

स्वादिष्ट श्रीखंड तयार करण्यासाठी प्रथम दही पातळ कापडात गुंडाळा. त्याचे पाणी पिळून एका भांड्यात ठेवा. मिक्सरमध्ये ठेवा आणि चीज क्रीममध्ये मिसळा.

मिश्रण घट्ट होईपर्यंत ते चांगले मिसळा. आता एका भांड्यात ठेवा आणि दुधासह साखर, पिस्ता, केशर घाला. नीट मिसळून झाल्यावर २-३ तास ​​फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी पिस्त्याने सजवा. थंड असताना केशर श्रीखंड उत्तम लागते.