
खानदेश म्हटलं की प्रथम डोळ्यासमोर काय येतं? अहिराणी भाषा आणि अर्थात येथील झणझणीत जेवण. खानदेशातील पदार्थ आजही आवडीने अनेक ठिकाणी खाल्ले जातात. यात शेवभाजी, डाळ गंडोरी, डाळ बट्टी, निस्त्याची चटणी, शेंगदाण्याची पातळ चटणी, कळण्याचं पुरी-भरीत, तुरीचा घेंगा, बोरांची भाजी, केळीची भाजी, तूरडाळीचे भेंडके हे पदार्थ तर तुफान लोकप्रिय आहेत. पण, खानदेशची स्पेशल भरली मिरची कधी ट्राय केली आहे का? नसेल तर एकदा तरी जरुर करुन पाहा. रोजच्या साध्या जेवणात ही मिरची अॅड केली तर जेवणाची चव आणि लज्जत काही औरच होते. म्हणूनच, खानदेशी स्टाइल भरली मिरची कशी करायची ते पाहुयात. (khandesh-food-recipe-bharle-mirchi)
साहित्य -
जाड मिरच्या - ५-६ ( कमी तिखट असलेल्या)
शेंगदाण्याचा कुट - १ वाटी
लसूण -४ पाकळ्या
धणे-जिरे पूड - २ टीस्पून
२-३ लसूण पाकळ्या
फोडणीचं साहित्य
मीठ
कृती -
प्रथम तेल न टाकताच कोरड्या मिरची तव्यावर भाजून घ्या. मिरची गार झाल्यावर मधोमध चिर देऊन त्यातील बिया काढून टाका व मीठ लावून १०-१५ मिनीटं ठेऊन द्या. त्यानंतर शेंगदाण्यांचा कूट, हळद, मीठ, धणे-जिरेपूड, लसूण एकत्र करा व खलबत्त्यात छान कुटून घ्या. शेंगदाण्याच्या कुटाला थोडं तेल सुटेल व लसूण बारीक होईल इथपर्यंत कुटा. सगळं वाटण छान वाटून झाल्यानंतर तव्यावर किंचित तेल घालून मिश्रणाचा गोळा त्यावर परतून घ्या. हे मिश्रण ओलसर होईलपर्यंत परता. मिश्रणाचा ओलसर गोळा झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे एक-एक करत सगळ्या मिरच्यांमध्ये भरुन घ्या. त्यानंतर पुन्हा तव्यावर तेल गरम करुन त्यात मिरच्या सोडा. ( मसाला भरलेली बाजू प्रथम भाजून घ्या.) त्यानंतर मिरची मऊसर होईपर्यंत भाजा. अशाप्रकारे खानदेशी स्टाईलची भरलेली मिरची तयार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.