
वैशिष्ट्ये
स्वयंपाक घरात एखादी गोष्ट ऐनवेळी लागते आणि ती उपलब्ध नसते, तेव्हाच तिचे खरे महत्त्व पटते. (स्वयंपाक घरात दररोज काम करणाऱ्या महिलांना या वाक्याची तीव्रता अधिक चांगली समजेल!) घराच्या घरी चटकदार पिझ्झा तयार करणे किंवा तो आउटलेटमधून मागवणे, हा आता प्रत्येक घरातील वीकएंड प्रोग्राम झाला आहे. मात्र, पिझ्झा तयार केल्यानंतर तो अगदी समान भागांत (कोणालाही नाराज न करता) व्यवस्थित कापणे, ही खरेतर तारेवरची कसरत. पिझ्झा कात्री तुम्हाला या संकटातून नक्कीच बाहेर काढू शकेल. धारदार पात्यांच्या मदतीने पिझ्झा वेगाने कापणाऱ्या आणि अगदी मोजून समान भाग करणाऱ्या या कात्रीमुळे तुमचा पिझ्झा खाण्याचा अनुभव आणखीनच यम्मी होईल, यात शंका नाही.