Makar Sankranti 2023 :  संक्रात स्पेशल गुळपोळी कशी बनवायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti 2023

Makar Sankranti 2023 :  संक्रात स्पेशल गुळपोळी कशी बनवायची?

नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. भारतात विविध नावांनी हा सण ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच याची ओळख आहे.

संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. त्यामूळे थंडी आणि ऋतूबदलापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी काही खास पदार्थ आपल्याला मदत करतात. संक्रातीत तीळ आणि गुळापासून बनलेल्या पदार्थांना महत्त्व असते. तीळ शरीरातील उष्णता टिकवून ठेवते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली.

हेही वाचा: Makar Sankranti 2023: येत्या संक्रांतीला बिपाशाच्या ब्लॅक साड्यांचं भारी कलेक्शन नक्की ट्राय करा

तीळ आणि गुळापासून बनलेले तिळगूळ चविष्ट आणि आरोग्यासाठी लाभदायी असतात. तसे, गुळापासूनही अनेक पदार्थ या खास दिवशी बनवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे तिळगुळाची पोळी. ती कशी बनवायची आणि कशी खायची याबद्दल आज जाणून घेऊयात.

हेही वाचा: Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीच्या पार्श्भूमीवर मुंबईत नायलॉन मांजाला पोलिसांकडून बंदी...

गुळपोळीचे खास सारण

सगळ्यात आधी १ वाटी तीळ कढईत भाजून घ्या. त्यानंतर पाव वाटी खसखस आणि पाववाटी खोबऱ्याचा किस वेगवेगळा करून कढईत भाजा. त्यानंतर कढईत २ टेबलस्पून तेल टाका. त्यात पाव वाटी बेसन पीठ टाका आणि ते तेलात परतून घ्या.

हेही वाचा: Makar Sankrant 2023 : लहान मुलांचं बोरन्हाण का करतात?

परतून घेतलेले बेसन पीठ, भाजलेले तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये टाका. त्यात अर्धी वाटी दाण्याचा कुट, १ टीस्पून जायफळ पावडर, थोडीशी विलायची टाका आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात पावशेर गुळ टाका. ते देखील मिक्सरमधून बारीक करून घ्या.

हेही वाचा: Chirote Recipe : खायला खुसखूशीत अन् बनवायला एकदम सोपे असे चिरोटे!

आता पोळीसाठी कणिक भिजवून घ्या. त्यासाठी एक कप कणिक, १ कप मैदा आणि त्यात चिमुटभर मीठ टाका. थोड तूप टाका आणि गरजेनुसार  पाणी टाकून कणिक मळून घ्या.

हेही वाचा: Food: पोळी करण्यासाठी पीठ मळल्यावर किती वेळाच्या आत पोळ्या कराव्यात ?

कणिक छान मऊसर मळली की त्याचा एक लहान गोळा घ्या. सारण भरण्यासाठी हातानेच त्या गोळ्याला मध्यभागी खोलगट करा. खोलगट भागात सारणाचा गोळा टाकून तो सगळीकडून पॅक करून घ्या.

आता या गोळ्याला पीठ लावा आणि पोळपाटावर ठेवून पोळी लाटा. पोळी खरपूस भाजून घ्या. आणि त्यावर तुपाची धार सोडून ती फस्त करा.