घरी तयार करा स्वादिष्ट लसणाचे लोणचे जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत

Make at home a garlic pickle food tips marathi news
Make at home a garlic pickle food tips marathi news

कोल्हापूर : लोणचे हे जेवणामध्ये एक वेगळेच समाधान देते. अंबा, लिंबू लोणच्या चा स्वाद तुम्ही घेतलाच आहात परंतु लसूण लोणचे हा एक आगळावेगळा आणि स्वादिष्ट लोणच्याचा प्रकार आहे.  गरमागरम पराठा बरोबर लसुन  लोणचे मिळाले तर स्वाद आणखीनच वाढतो.

लसुन लोणच्याला गार्लिक पिकल या नावाने ओळखले जाते. हे लसूण तयार करण्याची अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. यामध्ये गोड  खारट आणि मसालेदार स्वाद असत. जर तुम्ही लोणच्याचे शौकीन असाल  तर तुम्हाला लसुन लोणच्याची रेसिपी नक्कीच आवडेल या लोणच्याला भारतीय मसाल्याचं जोड देऊन त्याला अधिकच आपण स्वादिष्ट बनवू शकतो. आपल्या कुटुंबातील सर्वांना जेवणा मधील लज्जतदार आस्वाद साठी तुम्हीही रेसिपी नक्कीच घरात बनवू शकता.

आवश्यक साहित्य 
जरुरीनुसार लसनाचे गड्डे
 एक लहान चमचा तिळाचे तेल 
एक लहान चमचा लिंबूचा रस 
एक चमचा शिरका 
 एक लहान चमचा साखर 
आवश्यकतेनुसार मीठ 
पाव  चमचा हळद
 एक लहान चमचा सरसाचे बिया 
एक लहान चमचा बडीशेप 
एक लहान चमचा मेथी 
एक लहान चमचा काळा जिरा 
जरुरीनुसार हिंग


कृती

1) जर लसणाच्या पाकळ्या मोठे असतील तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.

2) कढईमध्ये  तिळ घेऊन त्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बडीशेप आणि मेथी मिक्स करा मध्यम गॅसवर दोन ते तीन  त्याला चांगले भाजून घ्या.  सर्व सहित्य चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर ते बारीक करून घ्या
 3) कढईमध्ये  तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि कलोजी घाला व मध्यम गॅसवर उकळून घ्या.
 4) कढई मध्ये काढलेले कापलेले लसुन घाला ते चांगल्या पद्धतीने भाजून घ्या. लसणाला तपकिरी रंग येऊ पर्यंत ते भाजा. आता बारीक केलेला मसाल्याचे पदार्थ यामध्ये मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये हळद मिरची पुड आणि चवीनुसार मीठ घाला.
 5)  दोन ते तीन मिनिट सर्व साहित्य उकळून घ्या आणि गॅस बंद करा. त्यामध्ये लिंबूचे रस आणि शिरका घालून चांगल्या पद्धतीने मिक्स करा.
 तुमचे स्वादिष्ट लसुन लोणचे जेवणाबरोबर वाढण्यासाठी तयार झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com