काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर घरीच तयार करा हॉटेलसारखी दही पापडी चाट

Make at home a hotel flavored curd papdi chaat food tips marathi news
Make at home a hotel flavored curd papdi chaat food tips marathi news

कोल्हापूर : उत्तर भारतातील अनेक रेसिपी देशभर प्रसिद्ध आहेत. यातीलच एक दही पापडी चाट सर्वांनाच लोकप्रिय  आहे. दही पापडी चाट चे नुसते नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मुख्यता हा पदार्थ दही आणि छोटी पापडी यापासून तयार केला जातो. जर तुम्हाला हॉटेलमधील दही पापडी ची टेस्ट घरामध्येच अनुभवायचे असेल तर आम्ही याबाबत असणारी कृती तुम्हाला सांगणार आहोत.

दही पापड चाट तयार करण्यासाठी घरातच असलेले अनेक सहित्य आपणास उपयोगी येते. त्यामुळे आपण सहजपणे झटपट हा स्वादिष्ट मेनू तयार करू शकतो. चला तर आपण घरांमध्येच हॉटेलच्या स्टाईल मधील दही पापडी चाट तयार करूया.
लागणारे 

साहित्य
- 10 पापडी
 जरुरीनुसार दही,
 धण्याची पूड,
चिंचेचा रस, 
दोन कापलेले कांदा, 
दोन उकडलेले बटाटे, 
एक लहान चमचा चाट मसाला, 
एक लहान चमचा
 जीरा चूर्ण
,जरुरीनुसार कोथंबीर 
लाल मिरची, 
एक लहान चमचा साखर, 
एक कप उकडलेले हरभरा.

असे बनवा  दही पापडी


1) एका बाऊल मध्ये दही घ्या आणि त्यामध्ये साखर टाका हे चांगले चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.
 
2) एक प्लेट घ्या त्या फ्लॅटमध्ये पापडी घाला त्यावरती उकळलेले  बटाट्याचे तुकडे करून टाका.  उकडलेले हरभरे, कांदा आणि दही त्यामध्ये मिक्स करा.
  
3 )त्यानंतर मीठ, जिरे पावडर, मिरची पावडर टाका. यामध्ये काही प्रमाणात चिंचेचे पाणी आणि धण्याची  चाट मसाला आणि कोथिंबीर टाका. त्यानंतर खाण्यास देण्यापूर्वी त्यावरती शेव टाकण्यास विसरू नका.
 अशा पद्धतीने तुम्ही घरातच हॉटेलच्या चवीचे दही पापड चाट छान पैकी आस्वाद घेऊ शकता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com